
आशाताई बच्छाव
कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या ११ गोवंशीय जनावरांची सुटका. अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यात जकाते वस्ती येथे कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या ११ गोवंशीय जनावरांची सुटका स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात एका जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तय्यब नसीर बेपारी (रा.खाटीक गल्ली, श्रीगोंदा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीत व्यक्तीचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा येथील जकाते वस्तीवर एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरे कत्तली साठी डांबून ठेवले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून ११ जनावरांची सुटका करण्यात आली. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.