Home बुलढाणा मुंबईत आमदार संजय गायकवाड यांच्या छातीत चमक… पण चिंता नसावी!!

मुंबईत आमदार संजय गायकवाड यांच्या छातीत चमक… पण चिंता नसावी!!

23
0

आशाताई बच्छाव

1001354847.jpg

मुंबईत आमदार संजय गायकवाड यांच्या छातीत चमक… पण चिंता नसावी!!
युवा मराठl न्यूज बुलढाणा जिल्ह्यl ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा, :-बुलडाणा विधानसभा अधिवेशनासाठी मुंबईत असलेल्या आमदार संजय गायकवाड यांच्या छातीत आज सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास अचानक कळ उठली होती. आज सकाळपासून त्यांना दोनदा छातीत दुखण्याचा त्रास झाला त्याच्यामुळे त्यांना तात्काळ जेजे हॉस्पिटल आणि नंतर हिंदुजा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. दोन्ही ठिकाणी आमदार गायकवाड स्वतः चालत गेले होते हे विशेष. हॉस्पिटल मधील डॉक्टरांच्या टीमने तात्काळ त्यांच्या सर्व तपासण्या केल्या. त्यांचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आल्याचे समजते. विशेष म्हणजे त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासंदर्भात युवा मराठा ने त्यांच्याशी संपर्क साधला असता आ. गायकवाड यांनी सांगितले की, आज सभागृहात मतदार संघातील प्रश्न मांडण्यासोबतच बेताल वक्तव्य करणाऱ्या कुणाल कामराला भाषणातून झोडून 5:29:37
काढले… प्रश्न मांडण्याआधी मी सखोल अभ्यास करतो.. मुद्दे मांडताना आणि खोडतांना तथ्यांसह बोलतो… पण यासाठी मला प्रचंड मेहनत घ्यावी लागते… केवळ दोन तासच झोप होत आहे… शेकडो किलोमीटरचा सततचा प्रवास आहे… त्यामुळे स्ट्रेस वाढला आहे… त्याचाच त्रास झाला असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे… अर्थात मला काही फरक पडत नाही, माझ्या कामाची गती जी आहे तीच राहिल”, या शब्दांत आमदार गायकवाड यांनी आपल्यातील दुर्दम्य आत्मविश्वास व्यक्त केला. आ. गायकवाड यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, निषाद येरमुले सोबत आहेत. आमदार गायकवाड आपल्या आक्रमक शैलीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय नेते असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते निकटवर्तीय आहे. राज्यात पहिलीपासून सीबीएसई पॅटर्नची घोषणा नुकतीच झाली आहे. यासाठी आमदार संजय गायकवाड यांचा पाठपुरावा महत्वाचा मानला जातो.

Previous articleदुर्दैवी BIG BREAKING! सुसाट पल्सर झाडावर आदळली; ३ तरुणांचा जागीच मृत्यू ! चिखली-जाफ्राबाद रोडवरील घटना
Next articleराहुरीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना; आंदोलकांनी महामार्ग रोखला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here