Home बुलढाणा इंस्टाग्रामवर ओळखीतून दोघांमध्ये प्रेम झालं; लॉजवर जाऊन सर्व मर्यादा ओलांडल्या, ब्रेकअपनंतर आरोपीची...

इंस्टाग्रामवर ओळखीतून दोघांमध्ये प्रेम झालं; लॉजवर जाऊन सर्व मर्यादा ओलांडल्या, ब्रेकअपनंतर आरोपीची चाल तरुणीच्या लक्षात, आता थेट शेगाव पोलीस ठाण्यात धाव…….

41
0

आशाताई बच्छाव

1001354835.jpg

इंस्टाग्रामवर ओळखीतून दोघांमध्ये प्रेम झालं; लॉजवर जाऊन सर्व मर्यादा ओलांडल्या, ब्रेकअपनंतर आरोपीची चाल तरुणीच्या लक्षात, आता थेट शेगाव पोलीस ठाण्यात धाव…….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- शेगाव तालुक्यात इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या २३ वर्षीय कुमारिकेला प्रेमाच्या जाळ्यात फसवून लग्नाचे आमिष देत बलात्कार केल्याची घटना १७ जून २०२४ रोजी घडली.
याबाबत पिडीत कुमरिकेने शहर पोलिसात तक्रार दिली आहे. आरोपी विकास विठ्ठल यामे रा. सांगवी, ता अहमदपूर जि. नांदेड याने इंस्टाग्रामवर ओळख करून प्रेमसंबंध निर्माण केले. सविस्तर वृत्त अशे की Watch तालुक्यात मध्ये एक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने लग्नाचं आमिष दाखवत तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे. दोघांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती.
या ओळखीतून दोघांमध्ये प्रेम झालं होतं. यातूनच त्यांनी शेगाव येथे लॉजवर जाऊन सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. पण ब्रेकअपनंतर आरोपीची चाल तरुणीच्या लक्षात आली. यानंतर तिने थेट शेगाव पोलीस ठाण्यात जात बॉयफ्रेंडविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पीडित तरुणीचा जबाब नोंदवून घेतला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. शेगाव पोलीस स्टेशनला विकास यामे असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी त्याची इन्स्टाग्रामवर पीडित तरुणीशी ओळख झाली होती. अनेक दिवस इन्स्टाग्रामवर चॅटींग केल्यानंतर दोघेजण एकमेकांच्या प्रेमात पडले आणि भेटीगाठी सुरू झाल्या. १७ जून २०२४ रोजी आरोपी आणि पीडितेला घेऊन शेगावला आला होता. याठिकाणी दोघंही एका लॉजवर थांबले होते. याठिकाणी आरोपी तरुणाने पीडितेवर जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत म्हटले आहे. यानंतर डिसेंबर २०२४ मध्ये पुन्हा दोघं शेगावला भेटले. यावेळीही आरोपीनं पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवले. वारंवार शरीरसंबंध ठेवल्यानंतर मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये दुरावा

Previous articleवडलापेठ लोह प्रकल्पाला माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी दिले समर्थन
Next articleदुर्दैवी BIG BREAKING! सुसाट पल्सर झाडावर आदळली; ३ तरुणांचा जागीच मृत्यू ! चिखली-जाफ्राबाद रोडवरील घटना
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here