Home वाशिम नालंदानगरात पाणीटंचाई, मुख्याधिकार्‍यांची बेपर्वाई, भीमसंग्रामने सुरू केली उपोषणाची लढाई

नालंदानगरात पाणीटंचाई, मुख्याधिकार्‍यांची बेपर्वाई, भीमसंग्रामने सुरू केली उपोषणाची लढाई

101
0

आशाताई बच्छाव

1001350158.jpg

नालंदानगरात पाणीटंचाई, मुख्याधिकार्‍यांची बेपर्वाई, भीमसंग्रामने सुरू केली उपोषणाची लढाई

वाशिम गोपाल तिवारी ब्युरो चीफ- श्रमिक वस्ती असलेल्या नालंदानगरातील अर्ध्या भागात मोठी पाईपलाईन बसवण्यात आलेली नाही. नगर परिषदेच्या जुन्या पाईपलाईनमधून पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्यामुळे या भागात पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. नागरिकांना पदरचे पैसे खर्चून पाणी विकत घ्यावे लागत आहे. या भागात त्वरित मोठी पाईपलाईन बसवून नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी भीमसंग्राम सामाजिक संघटनेने आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
सोमवार, २४ मार्च रोजी संघटनेच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष माया रमेश वाठोरे यांच्या नेतृत्वाखाली आणि असंख्य महिलांच्या उपस्थितीत जिल्हाधिकार्‍यांना आमरण उपोषणाच्या इशार्‍याचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, सर्व जनतेला स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे हे शासनाचे धोरण आहे. यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्चून प्रत्येक शहरात जलकुंभ आणि पाईपलाईनचे जाळे विस्तारण्यात आले आहे. असे असले तरी वाशिम नगर परिषदेच्या ढिसाळ धोरणामुळे शहरातील अनेक भाग अद्यापही तहानलेले असून काही भागांत गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात आहे. धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही गेल्या अनेक महिन्यांपासून श्रमिक वस्ती असलेल्या नालंदानगर भागात १० ते १२ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. शहरातील सर्व भागांत मुबलक पाणीपुरवठ्यासाठी मोठी पाईपलाईन बसवण्यात आली आहे. तसेच २४ तास वीज उपलब्ध राहण्यासाठी एकबुर्जी धरणावर एक्सप्रेस फीडर बसवण्यात आला आहे. मात्र अधिकार्‍यांच्या अकार्यक्षम धोरणामुळे नालंदानगरातील अर्ध्या भागात अद्याप मोठी पाईपलाईन बसवण्यात आलेली नाही. यामुळे या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणे कठीण झाले असून ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. नागरिकांना पदरचे पैसे खर्चून पाणी विकत घ्यावे लागत आहे. या भागात सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी भीमसंग्राम संघटनेने वेळोवेळी दिलेल्या निवेदनाला नगर परिषदेकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील महिलावर्गामध्ये नगर परिषदेच्या धोरणाविषयी संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे नालंदानगर परिसरातील उर्वरित भागात मोठी पाईपलाईन त्वरित बसविण्याचे आदेश नगर परिषदेला द्यावेत. तसेच हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. अन्यथा संघटनेला नाईलाजाने या भागातील महिलांसह आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसावे लागेल. तसेच या दरम्यान उद्भवणार्‍या परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देताना भीमसंग्रामच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष माया रमेश वाठोरे यांच्यासह मनिषा चंचल वानखेडे, मनिषा रवी वानखेडे, लक्ष्मी पट्टेबहादूर, लता खंडारे, दीक्षा वैद्य, विद्या शर्मा, शिल्पा पवार, विमल वाघमारे, सुनीता वाघमारे, रेखा भिसे, सोनू वानखेडे, जयश्री खिल्लारे, संध्या इंगोले, किरण तायडे, रेखा इंगळे, वच्छला पाईकराव आदी नालंदानगरातील महिला उपस्थित होत्या

Previous articleग्रामसभा व मासिक सभा न घेता निधीचा गैरव्यवहार ? चिंचोली उपसरपंचाचे आमरण उपोषण
Next articleम.श्री.रविराजदादा यांना महानुभाव सांप्रादायातील प्रतिष्ठित मोहंती सन्मानपूर्वक प्रदान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here