आशाताई बच्छाव
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघ यांनी कामगार प्रमाणपत्रावर सही करण्याचा दिला नकार
मागील सहा महिन्यापासून बांधकाम कामगारांचे प्रकरण थंड बस्त्यात
संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये बांधकाम कामगार मजुरांनी 90 दिवस काम केल्याचे कागदपत्र भरून दिलेले आहे. परंतु त्या प्रमाणपत्रावर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघटना यांनी त्या प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्याचा स्पष्ट नकार दिलेला आहे. त्यामुळे मागील सहा महिन्यापासून ग्रामपंचायत अधिकारी बांधकाम कामगारांच्या प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ करीत आहेत. या संबंधात पत्रकार संजीव भांबोरे यांनी दूरध्वनीवरून पहेला येथील ग्रामपंचायत अधिकारी गेडाम यांच्याशी संपर्क केले असता राज्य पातळीवर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघाचे आंदोलन सुरू असल्यामुळे बांधकाम कामगारांच्या प्रमाणपत्रावर सही देता येत नसल्याचे सांगितले. संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना खंडविकास अधिकारी यांनी प्रमाणपत्र देण्याबाबत पत्र दिलेले आहे. परंतु कोणतेही बांधकाम कामगार संबंधाने ग्रामपंचायतला नोंद नसल्यामुळे ग्राम विकास अधिकाऱ्यांनी सदर पत्राला केराची टोपली दाखवली असून खातरजमा करता येत नसल्याचे सांगितले. व उलट ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी खातरजमा शब्दाचे स्पष्टीकरण करण्यासंबंधात गट विकास अधिकारी यांना कळविले आहे. अशी माहिती सुद्धा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी मागितलेली आहे.