आशाताई बच्छाव
परळीतील शक्तीकुंज वसाहती जवळील रस्त्याचा पॅच तात्काळ दुरुस्त करा – अँड.मनोज संकाये
राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नागरिक हैरान!
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड/परळी
परळी शहरातील थर्मल पॉवर स्टेशनच्या कॉलनी परिसरातील शक्तीकुंज वसाहती जवळील परळी – गंगाखेड राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून त्या महामार्गावर शक्तीकुंज वसाहतीच्या मुख्य द्वारासमोर पॅच सोडले आहेत. राष्ट्रीय महामार्गाचे सर्व अधिकाऱ्यांनी या कामाकडे दुर्लक्ष केले असून हा पॅच तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांनी केली आहे. शक्तीकुंज वसाहतीमध्ये भेल सेकंडरी इंग्लिश स्कूल, न्यू हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच थर्मल पावर स्टेशन येथील अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. या रस्त्यावरून रहदारी मोठ्या प्रमाणावर आहे. राष्ट्रीय महामार्ग परळी ते गंगाखेड काम चालू असल्याने याच ठिकाणी एक पॅच सोडण्यात आला आहे. त्यामुळे तेथील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. अनेक वाहनधारकांचे अपघात होत आहेत. विद्यार्थी तसेच नागरिक यांचेही अपघात होत असल्याने हा पॅच नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांनी तात्काळ लक्ष देऊन हा सोडलेला पॅच तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.