आशाताई बच्छाव
बेलापूर रेल्वे स्टेशनवर जागतिक महिला दिन साजरा
श्रीरामपूर,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी) बेलापूर रेल्वे स्टेशनवर जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजक बेलापूर रेल्वे स्टेशन प्रबंधक एम पी पांडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन होते त्यांनी बेलापूर रेल्वे स्टेशन येथे विविध पदावर कार्यरत असणाऱ्या महिला ऑफिस सुपरडेंट श्रीमती रेखा मुगळीकर सी.सी. टि.सी. ,श्रीमती बी डी सिंग बुकिंग सुपरवायझर ,श्रीमती सुनिता तारे रिझर्वेशन सुपरवायझर, कुमारी शितल मोकळ आदी महिलांचा रेल्वे स्टेशन प्रबंधक एम.पी पांडे रिपाई चे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन आरपीएफ इन्स्पेक्टर श्री. विद्यांशु सिंग ,मुख्य वाणिज्य निरीक्षक श्री.अशोक कुमार यादव आणि गोरख आढाव यांच्या हस्ते त्यांचा व बेलापूर रेल्वे स्टेशन येथे कार्यरत असणाऱ्या सर्व महिलांचा पुष्पगुच्छ शाल देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी सुभाष त्रिभुवन म्हणाले की जगाच्या पाठीवर महिला आता कुठेच कमी राहिलेली नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये तिने आपले नाव कोरले आहे तसेच यशस्वी पुरुषा पाठीमागे महिलांचा हात असतो हे जग जाहीर आहे म्हणून महिलांचा सन्मान हा ८ मार्च पुरता मर्यादित न राहता प्रत्येक दिवशी प्रत्येक महिलांचा मान सन्मान करून आदराची वागणूक दिली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने रोज महिला दिन साजरा केल्याचे सार्थक होईल असे शेवटी सुभाष त्रिभुवन म्हणाले तसेच रेल्वेने ८ मार्च औचित्य साधून श्रीमती रेखा मुगळीकर यांना प्रमोशन देऊन टीसी केले आहे तसेच सत्काराला उत्तर देताना श्रीमती रेखा मुगळीकर म्हणाल्या की 8 मार्च माझा वाढदिवस असून आज जागतिक महिला दिन आहे याच दिवशी सेंट्रल रेल्वेने मला प्रमोशन गिफ्ट देऊन टीसी केले आहे सेंट्रल रेल्वेची मी आभारी आहे तसेच प्रत्येक पुरुषाने प्रत्येक महिलांना रोज आत्म सन्मानाने वागणूक दिली पाहिजे हीच अपेक्षा प्रत्येक स्त्रियांची असते असेही शेवटी श्रीमती मुगळीकर म्हणाल्या त्यावेळी रेल्वे कर्मचारी उपस्थित होते






