आशाताई बच्छाव
चाळीसगाव तालुक्यात विवाहीतेवर अत्याचार
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- विवाहित महिला घरात एकटी असताना जेवणाचा डबा घेवून जाण्याच्या बहाण्याने चुलत जेठाने घरात घुसून विवाहितेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
तर झालेला प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होताच पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपीला अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी की चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील 19 वर्षीय विवाहीतेचा पती तालुक्याच्या ठिकाणी दवाखान्यात उपचारार्थ दाखल असल्याने त्यांच्यासाठी जेवणाचा डबा तयार करून चुलत जेठ संशयित संजय मधुकर जाधव याच्याजवळ देण्यास विवाहीच्या सासर्याने सांगितल्याने आरोपी चुलत जेठ संजय जाधव 28 रोजी सायंकाळी 6-45 वाजेच्या सुमारास विवाहीतेच्या घरी जावून तिचे रूमालाने तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. व हा प्रकार कुणाला सांगितला तर मारून टाकण्याची धमकी दिली.
विवाहितेने दवाखान्यात जाऊन हा प्रकार आपल्या कुटुुंबियास सांगितला. त्यानंतर विवाहीतेने आरोपी संजय जाधव याचे विरोधात फिर्याद दिल्यावरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता 2023चे कलम 64(1), 351(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीसांनी संशयितास अटक केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहेत.






