आशाताई बच्छाव
पत्रकारांना अरेरावी करणाऱ्या तुळजापूर तहसीलदारावर गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबित करा
पत्रकारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
तुळजापूर : पत्रकारांना अरेरावी करून केबिन मधून हाकलून अपमान करणाऱ्या तुळजापूर जि. धाराशिव तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्यावर गुन्हा नोंद होणार. दि. 25 फेब्रुवारी रोजी तुळजापूर येथील तहसील मध्ये अखिल भारतीय भ्रष्टाचार समितीचे वीना परवाना वीट भट्टीधारका विरोधी सामूहिक आत्मदहन आंदोलन होते.ती बातमी संकलन व व्हिडिओ घेण्यासाठी पत्रकार गेले असता तहसीलदार अरविंद बोळंगे हे पत्रकारांना म्हणाले तुम्ही अगोदर बाहेर जा, शूटिंग करू नका, मला माहित आहे पत्रकार कसे असतात ते. असे म्हणून बाहेर हुस्कावण्याचा प्रयत्न केला व पत्रकारांना अपमानित केले. सदर आंदोलन तुळजापूर पीआय अनिल मांजरे यांच्या मदतीने स्थगित करण्यात आले. नंतर सर्व पत्रकार तहसीलदार यांच्या केबिनमध्ये गेले व म्हणाले आंदोलनाविषयी बाईट द्या (आपले म्हणणे सांगा) परंतु बाईट न देता पत्रकारांना अरेरावी करून पत्रकारांना केबिन मधून हाकलून दिले. अशाप्रकारे पत्रकारांच्या अधिकारावर गदा आणणाऱ्या मुजोर व कर्तव्यहीन, विटभट्टी धरकाबरोबर मिलीभगत असणाऱ्या तहसीलदार अरविंद बोळंगे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री,उपमख्यमंत्री, महसूल मंत्री धाराशिव एस पी यांना देण्यात आले.
शेवटी तात्काळ निलंबित नाही केल्यास सनदशीर मार्गाने महाराष्ट्राभर आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला. याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर सौ सारिका चुंगे, श्री लहूकुमार शिंदे, आकाश हळकुंडे, राहुल कोळी, रुपेश डोलारे, गणेश कांबळे, संतोष दुधभाते, प्रवीण राठोड, मकबूल तांबोळी, हैदर शेख, चांद शेख, सलीम पठाण आदी पत्रकारांच्या सह्या आहेत.