Home उतर महाराष्ट्र शनिशिंगणापूरच्या शनिला आता ब्रँडेड तेलानंच होणार अभिषेक, देवस्थानचा निर्णय

शनिशिंगणापूरच्या शनिला आता ब्रँडेड तेलानंच होणार अभिषेक, देवस्थानचा निर्णय

117

आशाताई बच्छाव

1001242189.jpg

शनिशिंगणापूरच्या शनिला आता ब्रँडेड तेलानंच होणार अभिषेक, देवस्थानचा निर्णय                                  अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी 
आता शनिशिंगणापूरच्या शनिला आता ब्रँडेड तेलानंच होणार अभिषेक, देवस्थानचा निर्णय
शनिशिंगणापूर देवस्थानाने आपला निर्णय जाहीर करताना म्हटले की, साधे तेल केमिकल युक्त असल्यामुळे शनि देवाच्या शिळेवर परिणाम होत आहे. त्यामुळे शनिदेवाच्या शिळेची हानी होऊ नये म्हणून विश्वस्त मंडळाने हा मोठा निर्णय घेतला आहे.
साधे तेल केमिकल युक्त असल्यामुळे परिणाम
जिल्ह्यातील अंतरराष्ट्रीय ख्यातीचे देवस्थान असलेल्या शनी शनिशिंगणापूर देवस्थानने मोठा निर्णय घेतला आहे. शनिशिंगणापूरच्या शनिदेवाला भाविकांकडून तेलाचा अभिषेक किंवा तेल अर्पण करण्यात येत असते. परंतु आता, शुद्ध आणि ब्रँडेड तेलच फक्त शनि देवाला वाहण्याचा विश्वस्त मंडळाकडून निर्णय जाहीर करण्यात आला आहे. शनिशिंगणापूर देवस्थानने आपला निर्णय जाहीर करताना म्हटले की, साधे तेल केमिकल युक्त असल्यामुळे शनि देवाच्या शिळेवर परिणाम होत आहे. अनेक भाविक वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यतेल किंवा मिश्रित तेल आणून अभिषेक करत असतात. मात्र, काही तेलांमध्ये भेसळ असल्यामुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होत आहे. हे झीज रोखण्यासाठी आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज रोखण्यासाठी निर्णय
शनिशिंगणापूर देवस्थानच्या नव्या नियमांनुसार, एक मार्चपासून भाविकांना फक्त ब्रँडेड आणि शुद्ध रिफायनरी तेलानेच अभिषेक करता येणार आहे. शनि शिंगणापूर हे श्रद्धेचे केंद्र मानले जाते. शनिदेवाच्या कृपेची प्राप्ती होण्यासाठी येथे हजारो भाविक तैलाभिषेक करण्यासाठी येतात. मात्र, शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज रोखण्यासाठी आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Previous articleजीवनबोधी बौद्ध हे धम्म व महापुरुषांच्या विचाराकरता समर्पित व्यक्तिमत्व
Next articleदापोडीत शिवजयंतीनिमित्त खेळाडूंना शिवराया क्रीडा गौरव पुरस्कार प्रदान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.