Home नांदेड स्वामी विवेकानंद महाविद्यालयात संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी

स्वामी विवेकानंद महाविद्यालयात संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी

103

आशाताई बच्छाव

1001239659.jpg

स्वामी विवेकानंद महाविद्यालयात
संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी

मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज वंटगिरे 

मुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात संत सेवालाल महाराज यांची जयंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली दि १५ फेब्रुवारी २०२५ रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात साजरी करण्यात आली. सुरुवातीला संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.आर.बी.बाविस्कर हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री चंद्रकांत पाटील व प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा.डॉ. आर.बी.मादळे उपस्थित होते. प्रमुख व्याख्याते डॉ.आर.बी. मादळे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या जीवन व कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.एस.एल.सकनुरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ.ई.व्ही. भिंगोले यांनी मानले.सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील डॉ.एन.एच. पांचाळ, डॉ.सय्यद.एम.एम., डॉ. जे.पी.काळे, प्रा.ढोकाडे आर.एस., डॉ.जी.जी. शेख, प्रा.राम बिरादार, प्रा.धनंजय मलशेट्टे, बालाजी सादगिरे, काशिनाथ शिंदे व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleरामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांना पन्हाळगडावर अभिवादन
Next articleयेवता येथे शिवश्री सुदर्शन आबासाहेब शिंदे यांच्या शिवचरित्रावर आधारित व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.