Home जालना पत्रकारांनी खात्री करूनच बातमी प्रकाशित करावी-आ.खोतकर

पत्रकारांनी खात्री करूनच बातमी प्रकाशित करावी-आ.खोतकर

70

आशाताई बच्छाव

1001128462.jpg

पत्रकारांनी खात्री करूनच बातमी प्रकाशित करावी-आ.खोतकर
जालना/ प्रतिनिधी दिलीप बोंडे 
पत्रकारांनी बातमीची खात्री करून सत्य आणि अचूक  अशी बातमी आपल्या दैनिकातून प्रकाशित करावी जेणेकरून एखाद्याच जीवन उध्वस्त होणार नाही व समाजात प्रतिष्ठा मलिन होणार नाही याची काळजी घ्यावी असे प्रतिपादन आमदार तथा शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर यांनी दैनिक गोकुळनिती तर्फे दर्पण दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमा प्रसंगी केले.
जालना येथील दैनिक गोकुळनितीच्या वतीने 6 जानेवारी 2025 रोजी कलश सीड्स येथील सभागृहात दर्पणदिन निमित्त पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे प्रदेश उपाध्यक्ष विकास बागडी हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून जालना विधानसभा आमदार तथा शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर हे होते प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सरकारी वकील ड. बाबासाहेब इंगळे, ड. महेश धन्नावत, ड. लक्ष्मण उढाण, ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख, कार्यक्रमाचे आयोजक दैनिक गोकुळनिती संपादक अर्पण गोयल यांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना खोतकर म्हणाले की, एखादी चुकीची बातमी एखाद्याचा आयुष्य उध्वस्त करू शकते त्यामुळे बातमीची खात्री झाल्याशिवाय बातमीची सत्ता त्या पाहिल्याशिवाय पत्रकारांनी ती प्रकाशित करू नये किती मोठी बातमी असली तो लपवण्याचा प्रयत्न केला तरी देखील ती लपवू शकत नाही आणि आपल्या महाराष्ट्राची खूप मोठी परंपरा आहे, समृध्द व सुसंस्कृत महाराष्ट्र आहे त्यामुळे ही परंपरा आपण जपली पाहिजे एखादी चुकीची बातमी ही आपल्या घरच्या विरोधात कोणी छापली तर ते आपल्याला किती वाईट वाटेल त्यामुळे बातमीची सत्यता तपासून बातमी प्रकाशित करावी.

Previous articleसंतोष भुतेकर यांना युवा पत्रकार पुरस्कार प्रदान
Next articleसंग्रामपूर तालुक्याचे तहसीलदार प्रशांत पाटील यांची धडाकेबाज कारवाई ! देउळगाव नदीपात्रा मध्ये अवैद्य रेती वाहन पकडत केला गुन्हा दाखल …
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.