आशाताई बच्छाव
महाराष्ट्र ५२ वें राज्य स्तरीय नाट्य स्पर्धा… भंडारा एस.टी. कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट अभिनय म्हणून गौरव…
सोलापूरच्या रंगमंचावर गाजली भंडाऱ्याची “जबरी”
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने आयोजित ५२ व्या आंतर विभागीय नाट्य स्पर्धेचे आयोजन हुतात्मा स्मृती मंदिर , डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक , सोलापूर येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भंडारा विभागातील एस.टी. कर्मचाऱ्यांनी “जबरी ” या ज्वलंत सामाजिक विषया वरील संगीत दोन अंकी नाट्यपुष्पाचे सादरीकरण करून रसिक – श्रोत्यांसह परीक्षकांच्या मनाच्या ठाव घेतला. नाट्य लेखक व मार्गदर्शक प्रा. शितल दोडके लिखित एस.टी.च्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कामातून वेळ काढून नाटकाची तयारी केली होती .
“जबरी ” हे नाटक ‘जाई’ नावाचे एका अत्याचार ग्रस्त युवतीची शोकांतिका आहे. जाई ,भाऊ दगडू आणि वडील नकटू या तीन लोकांच्या जीवनावर बेतलेलं हे नाटक ग्रामीण जीवनातील जर्जर अर्थव्यवस्थेत या तिघांची होणारी ओढाताण आणि त्यातून ठेकेदार नावाच्या वासनांध व्यक्तीने जाई वर केलेले अमानवी अत्याचार आणि त्यातून तिच्या वाट्याला आलेली विमनस्तकथा हृदय हेलावून सोडते . समाजाने नाकारलेल्या जाईला दगडू नावाच्या सख्खा भाऊ तिच्या विमनस्कतेसह सहज जवळ करतो .आज सुद्धा समाजामध्ये कितीतरी ‘जाई ‘ नावाच्या कितीतरी ‘ निर्भया ‘ “”जबरी”” बनत चाललेले आहेत . समाज मनाला हे नाटक विचार करण्यास प्रवृत्त करते आणि ठेकेदार नावाची प्रवृत्ती यानंतर मानवी प्रदेशातून हद्दपार झाली पाहिजे , अशी मागणी सुद्धा करते.
अत्यंत संवेदनशील सामाजिक असे “जबरी” नाटकाची कथा ही आजच्या वर्तमान परिस्थितीवर आधारभूत घेतलेली आहे. “जबरी” या नाटकातून व्यक्तीच्या व्यक्तीकडे पाहण्याच्या दृष्टिकोन व त्यांची भूमिका कशी बदलत जाते याच्या उवापोह करण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे .यात सहभागी कलावंतांनी सकस अभिनय करून आपल्या पात्राला न्याय देण्याच्या सर्वंकष प्रयत्न केला आहे. नेहमीच एस.टी. चे स्टेरिंग सांभाळणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी नाटकाचा रंगमंच देखील तितकाच ताकदीने सांभाळून आपल्या अभिनय कौशल्याची चुणूक दाखवली व सोलापूरच्या रंगमंचावर आपली अभिनय छटा सोडली . विभाग नियंत्रक तनुजा अहिरकर , उपयंत्र अभियंता संदीप खवडे , कामगार अधिकारी पराग शंभरकर , लेखक/ दिग्दर्शक प्रा. शितल दोडके, आस्थापना पर्यवेक्षक गायत्री फुंडे , पंकज वानखेडे , सुरेंद्र उके , उमा घाडगे , मेकअप आर्टिस्ट नुकुल राम श्रीवास,,संगीत दिग्दर्शक ऋतिक जी ,प्रशांत सहारे,,सुरेश शेंडे,सुरेश हलमारे, मोहीब खान भाई,सुकराम मलेवार, राजू भुते,अमोल गभने , नंदकिशोर गुरव ,सुभाष हटवार,कोमल उईकें , त्रिवेणी वाघमारे, संध्या मेश्राम , संगीता उके, दिपलता कडूकार, विलास मेश्राम, संदीप मेश्राम, सुभाष बावनकर, मंगेश मारवाडे, यांनी सहभाग घेतला.
उत्कृष्ट अभिनयाबद्दल कौतुकाच्या वर्षाव :-
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट अभिनयाबद्दल प्रथम क्रमांक संध्या मेश्राम तर “जबरी”” या नाटकाचे नेपथ्य व रंगमंच दिग्दर्शक म्हणून पंकज वानखेडे व सुरेश शेंडे यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.