आशाताई बच्छाव
अखेर बस स्थानका जवळ पोलीस चौकी
वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी होणार मदत
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-मोताळा येथील बस स्थानक परिसरात तसेच आठवडी बाजार परिसरात वाहनांसह नागरिकांची सतत वर्दळ असल्याने वाहतुकीची कोंडी होत होती. या संदर्भात युवा मराठा ने डिसेंबर महिन्यात टाकलेल्या बातमीचा असर मोताळ्यात बस स्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी या मथळ्याखाली वृत्त प्रकाशीत केले होते. या वृत्ताची दखल घेत काल बुधवार १ जानेवारी रोजी बोराखेडी पोलिसांच्या वतीने बस स्थानक चौक आणि बोराखेडी टी पॉइंटवर पोलिस चौकी सुरू करण्यात आली आहे.
या पोलिस चौकीत कायमस्वरुपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती केल्यास वाहतुक सुरळीत होण्यास मदत
होईल. सतत होत असलेल्या गर्दीमुळे याठिकाणी लहान-मोठे अपघात घडत असत. भविष्यातील अपघात टाळण्यासाठी तसेच वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी याठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची
नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करीत होते. परंतु स्थानिक पोलिस प्रशासनाने या मागणीची दखल घेतली नाही. नागरिकांची हेळसांड थांबवण्यासाठी ३१ डिसेंबरच्या अंकात मोताळा बस स्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी या मथळ्याखाली वृत्त प्रकाशीत केले होते. या वृत्ताची दखल घेत बोराखेडी पोलिसांच्या वतीने बसस्थानक चौक आणि बोराखेडी टी पॉइंटवर पोलिस चौकी • निर्माण केली आहे. परंतु या पोलिस • चौकीवर कायमस्वरूपी वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याची नियुक्ती केल्यास वाहतुक सुरळीत होण्यास – मदत होईल. पोलिस कर्मचारी तैनात • राहतात की नाही हे कळेल.