
आशाताई बच्छाव
बीड जिल्ह्यात केजमध्ये पुन्हा एका व्यक्तीच्या अपहरणाचा प्रयत्न जीव वाचवण्यासाठी काढला पळ
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड/केज ०१ जानेवारी २०२५ जिल्ह्यातील केज तालुक्यात पुन्हा एका व्यक्तीचे अपहरण करण्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काम मंजूर करून आणण्यासाठी मुंबईला चल म्हणून अपहरण करून मारहाण केल्याचा दावा अपहरण करता करीत असून, मी जीव वाचवण्यासाठी पळून आल्याचा दावा करण्यात आला. या घटनेने केज तालुक्यात खळबळ उडाली असून, बीड जिल्ह्यात चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ज्ञानेश्वर गणपती इंगळे रा. कळंबअंबा हल्ली मुक्काम केज असे अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. इंगळे यांना अपहरणकर्त्यांनी मुंबईहून वीस लाखांच्या कामाला मंजुरी आणू म्हणून केज येथील कळंब चौकातून चारचाकी वाहनात बसवुन घेऊन गेले. चुंबळी फाटा येथील बंद असलेल्या पेट्रोल पंपामध्ये नेहुन मारहाण केले. पायाला लोखंडी साखळी लावून कुलूप लावले, दोन्ही हाताला दोरीने बांधले व माझ्या जवळील पैसे मोबाईल काढून घेतला. त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत मी पळून आलो असल्याने जीव वाचल्याचा दावा अपहरण झालेले इंगळे करीत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवंत यांची भेट घेणार असल्याचे ते सांगत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असतानाच हा प्रकार घडल्याने केजमध्ये एकच खळबळ उडाली आहे.