
आशाताई बच्छाव
कौलाळे गटात रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार
पालघर प्रतिनिधी :सौरभ कामडी
जव्हार: तालुक्यातील कौलाळे गटात एकनाथ दरोडा यांच्या संकल्पनेतून बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं. त्यासाठी तिन जिल्हातील स्पर्धकांनी हजेरी लावली. तर दोन हजार शेतकऱ्यांनी मनसोक्तपणे स्पर्धेचा आनंद घेतला.
मागील तिन वर्षांपासून न्यायालयाने बंदी हटवल्याने महाराष्ट्रत पुन्हा एकदा बैलगाडा शर्यती जोमात सुरू झाल्या आहेत. याचंच औचित्त साधून गेली तिन वर्षांपासून पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुका पैकी कौलाळे ग्रामपंचायतमधे स्थित असलेल्या गारादेवी मैदानावर पुन्हा एकदा शर्यतीचा थरार बघायला भेटला.
दरम्यान झाप ग्रामपंचायत सरपंच व बहुजन विकास आघाडी पक्षाचे जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांच्या संकल्पनेतून २९ डिसेंबर रोजी कौलाळे गटात बैलगाडा शर्यत आयोजीत केली होती. यासाठी पालघर, ठाणे व नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील शेतकरी आपली बैल जोडी घेऊन स्पर्धेत हजर झाले होते. यावर्षी एकून ९० बैलगाड्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. त्यात रविवार असल्याने चाकरमान्यांनी देखिल आवर्जून उपस्थिती दर्शवली. यात लहान मुले, तरूण वर्ग व जेष्ठ नागरीक यांचा देखील सहभाग होता. या सर्वांनीच सुट्टीचा दिवस म्हणून शर्यतीचा मनमुराद आस्वाद घेतला. यावर्षी ५०० ते २००० रूपये पर्यंत बक्षिसांची खैरात होती. सबब यंदा प्रचंड दिलखुशपणे शेतकरीवर्ग दिवसभर गारादेवी मैदानावर खिळवून बसला होता.
जेव्हा आम्ही आयोजक एकनाथ दरोडा यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं कि “स्थानिक बाजारपेठत बैलांच्या किमतीला योग्य भाव मिळावा. तसेच शेतकरी परंपरा जोपासुन जास्तीत जास्त तरूण वर्ग शेतीकडे व्यवसायाकडे आकर्षित व्हावा. याच बरोबर लोप होत चाललेल्या ग्रामिण संस्कृतीला प्रोत्साहण देणे. महत्वाचं म्हणजे वर्षभर काबाडकष्ट करून थकलेल्या शेतकऱ्यांना वर्षाच्या शेवटी आनंदित करून वृद्ध बैलांना कत्तलखान्यापासून वाचवणे. हाच आमचा शर्यत आयोजीत करण्याच्या मुख्य उद्देश असतो. यास्तव आम्ही गेली तिन वर्षांपासून पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी शर्यत आयोजीत करीत असतो”. असे ही दरोडा यांनी आमच्याशी बोलतांना सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत शर्यतीचे अध्यक्ष प्रकाश करनोर, उपाध्यक्ष नारायण करनोर, खजिनदार संजय भला सोबत नांदगाव ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश कोरडे ,आनंदा करनोर, पुंडलिक करनोर,मनोज वाघमोडे, एकनाथ वाघमोडे,अशोक बाजगिर,तुकाराम बाजगिर ,दशरथ बाजगिर तमाम कार्यकर्ते उपस्थित होते.