Home गडचिरोली – जैन हिल्स व प्लॅन्ट फॅक्टरी हायटेक शेती महोत्सव जळगाव येथे आयोजन

– जैन हिल्स व प्लॅन्ट फॅक्टरी हायटेक शेती महोत्सव जळगाव येथे आयोजन

68

आशाताई बच्छाव

1001089558.jpg

– जैन हिल्स व प्लॅन्ट फॅक्टरी हायटेक शेती महोत्सव जळगाव येथे आयोजन

गडचिरोली जिल्हातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे

दिं 27/12/2024

गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ: दिनांक १४/१२/२०२४ पासून ते दिनांक १४/०१/२०२५ या कालावधीत जैन हिल्स, शिरसोली रोड, जळगांव तसेच जैन हाय-टेक प्लॅन्ट फॅक्टरी, टाकरखेडा, जळगांव येथे हायटेक शेती महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून या मध्ये मुख्यत्वेकरून सर्व प्रकारच्या ठिंबक व तुषार सिंचनाचे तंत्रज्ञान, महत्व व प्रत्यक्ष विविध पिकांसाठी वापर (केळी, ऊस, मोसंबी, पेरू, डाळिंब, भाजीपाला, व विविध हंगामातील पिक संग्रहालयये तसेच हरितगृहे इत्यादी) जैन टीश्यू कल्चर रोपे, सिडलिंग, कलमे, नर्सरी व नव नवीन तंत्रज्ञान या विषयी माहिती, प्रत्यक्ष प्लॉट भेट व शंकांचे निरसन करण्यासाठी सदर हायटेक शेती महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सदर शेती महोत्सवात प्रदर्शित करण्यात येत असलेल्या शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाची जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांना माहीती व्हावी व आपल्या जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रामधे वाढ होऊन शेतकऱ्यांचे उत्तन्न वाढिकरीता मदत होईल, कृषि महोत्सवा करीता आपल्या विभागाकढुन जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहून महोत्सवाचा लाभ घ्यावा.