आशाताई बच्छाव
सोनई परिसरात पाटचाऱ्या दुरुस्तीचे काम प्रगतिपथावर
पाटचाऱ्यांमधील झुडुपे काढण्याचे ७० ते ८० टक्के काम पूर्ण नेवासा -अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी
सोनई परिसरात पाटचाऱ्यांच्या दुरुस्तीचे काम प्रगतिपथावर आहे. मुळा उजवा कालवा सुटल्यानंतर परिसरातील पाटचाऱ्यांमधील व रस्त्यावरील वाढलेली झुडुपे काढून टाकण्यात आली आहेत.
७० ते ८० टक्के काम पूर्ण करण्यात आल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी घेण्यास कुठलीही अडचण राहणार नसल्याने पूर्ण क्षमतेने पाणी शेतीला मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. सोनई पब्लिक स्कूल चारीचे ० ते १३.२०० मधील कामाला जेसीबीच्या सहाय्याने सुरुवात झाली. बुधवार २५ डिसेंबर
अखेर ८.२०० पर्यंत काम पूर्ण झाले आहे. यात बेल्हेकरवाडी, घावटे मायनर, लांडेवाडी हे काम पूर्ण झाले असून पुढील काम लवकरच पूर्ण होणार आहे. नेवासा तालुक्यातील शेतीचा पाणी प्रश्न गंभीर होत असल्याने आवर्तन सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली
होती. अखेर मुळा धरणातून १९ डिसेंबरला उजवा कालव्यातून ३५ दिवसांसाठी रब्बीचे आवर्तन सोडण्यात आल्याने नेवासा तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी मोठा फायदा होणार आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे ओढे-नाले,
विहिरींना पाणी कमी होते. त्यात यंदा कडक उन्हाळा पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागले. पण मुळा धरण भरल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अनेक ठिकाणी कालव्यांच्या चाऱ्यांची दुरवस्था झालेली असल्याने ४७०१ अंतर्गत कामाला सुरुवात झाली आहे त्यामुळे काही पाटचाऱ्यांची कामे पाणी सोडण्याच्या आधीच पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याने व कालवा स्वच्छता झाला असल्याने पाण्याची बचत होणार आहे. यामुळे शेतकरी आनंदात आहेत.






