Home जळगाव चाळीसगावात जुगार खेळणार्‍या 32 जणांंवर कारवाई

चाळीसगावात जुगार खेळणार्‍या 32 जणांंवर कारवाई

238

आशाताई बच्छाव

1001089488.jpg

चाळीसगावात जुगार खेळणार्‍या 32 जणांंवर कारवाई

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- चाळीसगाव शहर पोलीसांनी शहरातील शिवाजी घाट परिसर तसेच स्टेशन रोड परिसरात लपून छपून जुगार खेळणार्‍या अड्ड्यांवर छापा टाकून 32 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 29 हजार 775 रूपयांची रोकड जप्त करण्यात आली. या कारवाईने जुगार खेळणार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील शिवाजी घाट तसेच स्टेशन रोड परिसरात लपून छपून अवैधरित्या जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर
उपनिरीक्षक योगेश माळी, हवालदार राहूल सोनवणे, प्रविण जाधव, अजय पाटील, विनोद पाटील, पोकॉ. रविंद्र बच्छे, अमोल भोसले यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकून 32 जणांना जुगार खेळतांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 29 हजार 775 रूपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या आरोपीतांवर कायदेशीर करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक यांनी दिली.

Previous articleबहाळ येथील सरपंच सह तिघे 5 लाखाची लाच स्वीकारताना ACB च्या जाळ्यात…
Next articleकृषि अधिकारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.