Home गडचिरोली गडचिरोली येथे सर्व पक्षीय बैठक संपन्न संविधान बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून 30...

गडचिरोली येथे सर्व पक्षीय बैठक संपन्न संविधान बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून 30 डिसेंबर रोजी गडचिरोली येते निषेध मोर्चा व सभा चे आयोजन

19
0

आशाताई बच्छाव

1001082868.jpg

गडचिरोली येथे सर्व पक्षीय बैठक संपन्न

संविधान बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून 30 डिसेंबर रोजी गडचिरोली येते निषेध मोर्चा व सभा चे आयोजन

गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ:: महाविकास (इंडिया) आघाडतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उबाठा ), अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया सह इतर पक्ष आणि सामाजिक संघटनाची सर्वपक्षीय बैठक पार पडली.
देशात आणि राज्यात सुरु असलेली अराजकता, देशाच्या सर्वोच्च स्थानी असणाऱ्यांकडून  वारंवार महापुरुषांचा होत असलेला अवमान, केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेले अवमानजनक वक्तव्य, बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख व परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निर्घृण हत्येचा निषेध व्यक्त करण्याकरीता व चौकशी ची मागणी व अस्या विविध मुद्याना घेऊन निषेध व्यक्त करण्याकरीता, गडचिरोली जिल्ह्यातील महाविकास (इंडिया ) आघाडीतील घटक पक्ष व जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांची सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली , या बैठकीत संविधान बचाव संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी, गडचिरोली शहरात शिवाजी महाविद्यालय ते इंदिरा गांधी चौक पर्यंत निषेध मोर्चा व त्यानंतर राजीव गांधी सभागृह येते निषेध सभा घेण्यात येणार आहे. संविधान बचाव संघर्ष समितीच्या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, अखिल भारतीय रीपब्लिकन पक्षाचे नेते रोहिदास राऊत, शिवसेना (उबाठा ) जिह्वाप्रमुख वासुदेव शेडमाके, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया चे नेते देवराव चवळे, सामाजिक कार्यकर्ते वसंत कुलसंगे, सतीश विधाते, विजय गोरडवार, ऍड. कविता मोहरकर, कुसुमताई आलाम, सुरेश भांडेकर, प्रदीप भैसारे, माधव गावड, राहुल भांडेकर, महेंद्र लटारे, नितेश राठोड, अमोल कुळमेथे, नहिम शेख, जावेद खान, काशिनाथ भडके, पौर्णिमा भडके, कविता उराडे, रिता गोवर्धन, सुशील हुलके, प्रल्हाद रायपुरे, ज्योती उंदिरवाडे, राजन बोरकर सह इतर पक्षाचे व सामाजिक संघटनाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Previous articleजिल्हा पेन्शनर्सचे साकोलीत २२ वे अधिवेशन संपन्न
Next articleमराठा क्रांती मोर्चा मुंबई , सकल मराठा समाज तर्फे निषेध आंदोलन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here