आशाताई बच्छाव
पुर्णा स. साखर का. च्या भोंगळ कारभारामुळे 11दिवस ऊस फंडात वाळत शेतकर्यांची मोठी आर्थिक नुकसान.
हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ -पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या भोंगळ कारखान्यामुळे पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये अनेक ऊस उत्पादक सभासद लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे पाहायला मिळत आहे .
साखर सम्राटांचा कारखाना म्हणून पूर्णा सहकारी साखर कारखाना कडे पाहिले जाते
पूर्ण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन चेअरमन हे महाराष्ट्र राज्याच्या साखर संघाच्या अध्यक्षपदी तर काही काळ राष्ट्रीय साखर संघाच्या अध्यक्षपदी यांनी कारभार सांभाळला आहे पन आज पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातच मोठी आडचन निर्माण होताना पाहायला मिळत आहे .
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या ऊस लागवडीच्या रीतशीर नोंदी करून सुद्धा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे
अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नोदि सुद्धा वेळेवर घेतल्या जात नाहीत तर काही कर्मचाऱ्याच्या व अधिकाऱ्याच्या मर्जीतील शेतकर्यांचे लागवड पुर्वी नोंद करून नंतर काही काळानंतर ऊसाची लागवड होत असअसल्याचे दिसून आले यामध्ये पूर्णा स.सा.कारखान्याच्या भोंगळ कारभारावर मोठा संसय निर्माण होताना पाहायला मिळत आहे .एकंदरीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर आपल्या शेतातील उसन गेल्यामुळे त्याचे ऊस वजनामध्ये मोठे घट होत असते व ऊसतोड कामगार जानेवारी नंतर फडात ऊस राहिल्यानंतर शेतकऱ्यांची मोठी आर्थिक पिळवणूक करत असते त्याचबरोबर ऊस वाहतूक करणारे वाहतूकदार सुद्धा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक लूट करण्यापासून मागेपुढे पाहत नाहीत एवढेच नाही तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या लागवडीपासून तोडचिट्टी देईपर्यंत शेतकऱ्यांना सा.का सहकार क्षेत्रातील साइटवर काम करणारे कर्मचारी सुद्धा चारी मिरी मागताना मागे पुढे पाहत नाहीत या असल्या भोंगळ कारभारामुळे पूर्णा कारखान्याचे नाव लौकिक असताना सुद्धा आता याच कारखानाचे नाव विविध ठिकाणी पायमल्ली होताना पाहायला मिळत आहे या आगोदर पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या सभोवताली साखर कारखान्याचे ऊस दर टनेजमध्ये 300 ते 400 रुपये अधिक आहेत परंतु पूर्णा सह.सा.का कारखान्याचा दर कमी असल्याने ऊस उत्पादक शेतकरी मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे दिसून येते सातेफळ येथील ऊस उत्पादक शेतकरी सभासद शेतकरी श्री.उत्तम गंगाराम अंभोरे यांची आपल्या शेतातील ऊस लागवडीची रीतसर नोंदणी केली असून त्या नोंदणी नुसार ऊस तुटला नाही पण काही कालावधीनंतर उसाला तोडचिट्टी व ऊस तोडायला सुरुवात झाली ऊस काही तोडून झाल्यातर शेतामध्ये तसा सोडून दिला व ऊस तोड कामगार ऊस वाहतूक ठेकेदार हे निघुन गेले पन काही काळ पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या अधिकारी व कर्मचाऱी यांच्या निष्काळजी धोरणामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 13 डिसेंबर तारखेला तोडण्यात आलेला ऊस 24 डिसेंबरला शेतातून पुर्णा स.सा.कारखान्याने भरून नेला त्यामुळे ऊसतोड केलेल्या उसाची उन्हा मुळे वजनात मोठी घट झाली व राहिलेला ऊस फडामध्ये तसाच अर्धवट तोड करून निघून गेल्यामुळे शेतकऱ्याच्या नशिबी दुरवस्था निर्माण झाली आहे सहकार क्षेत्राच्या अशा उतावीळ व निष्काळजी भोंगळ कारभारामुळे आता बागायतदार शेतकरीयाना आत्महत्या करण्याची वेळ येत आहे त्यामुळे पूर्ण सहकारी साखर कारखान्याच्या संबंधित चेअरमन संचालक मंडळ ऊस पुरवठा अधिकारी व इतर लागवड क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी यांनी जातीने लक्ष घालून या भोंगळ कारभाराची चौकशी करून ऊस उत्पादक शेतकरी यांना न्याय मिळवून द्यावा म्हणून ऊस उत्पादक शेतकरी यांचे कुटुंब सातेफळ गावांमध्ये नागरिकांमध्ये मागणी होत आहे.