आशाताई बच्छाव
_अटलजी ने आपले जीवन मजबूत, समृद्ध आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी समर्पित केले.._
_भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे_
गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ-_अटलजी ने आपले जीवन मजबूत, समृद्ध आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी समर्पित केले..भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी माजी पंतप्रधान ‘भारतरत्न’ अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आणि सांगितले की त्यांनी आपले जीवन एक मजबूत, समृद्ध आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी समर्पित केले.
माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. सशक्त, समृद्ध आणि स्वावलंबी भारत निर्माण करण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. त्यांची दृष्टी आणि ध्येय विकसित भारताच्या संकल्पाला बळ देत राहील.
आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे “भारतरत्न माजी पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी” यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिण्यात आली.
त्याप्रसंगी भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेशजी भुरसे,ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, जिल्हा सचिव अनिल कुनघाडकर, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, जनार्दन साखरे, बंडू झाडे, रमेश नैताम, अविनाश विश्रोजवार, विनोद देवजवार, केशव निंबोड, गणेश दहलकर, दर्शना भोपये उपस्थित होते.