Home भंडारा हुरहुन्हरी अन् रुग्णांच आयुष्य बदलून टाकणारा माणसातला देव माणूस_

हुरहुन्हरी अन् रुग्णांच आयुष्य बदलून टाकणारा माणसातला देव माणूस_

56
0

आशाताई बच्छाव

1001082102.jpg

हुरहुन्हरी अन् रुग्णांच आयुष्य बदलून टाकणारा माणसातला देव माणूस_

डॉ. लक्ष्मण राठोड यांना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते भारत उद्योग रत्न पुरस्कार नागपूर येथे प्रदान

 

नागपूर (संजीव भांबोरे)”शिक्षण”, “डिग्री”, “पैसा” यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो.”कष्ट”, “अनुभव” व “माणुसकी” हेच माणसाचं श्रेष्ठत्व ठरवते. याची प्रचिती डॉ. लक्ष्मण राठोड या युवकाच्या यशस्वीतेतून दिसून येते.
प्रचंड गरीब कुटुंबातील, विद्यार्थी जीवनातील अत्यंत खडतड प्रवास करत आणि आता एक डॉक्टर म्हणून जालना मंठा चौफुली येथे सत्यवी क्लिनिक हेअर, स्किन, लेझर सेंटर छोट्याश्या इस्पितळाची उभारणी करत आपल्या ज्ञान आणि गुणवत्तेच्या माध्यमातून अनेक रुग्णांना वर्षानुवर्ष अनेक समस्या आणि आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंदाची बाग फुलवणारा उखळी तांडा जालना जिल्ह्यातील डॉ. लक्ष्मण राठोड यांना भारत उद्योग रत्न पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते 16 डिसेंबर 2024 ला रिजेंडा हॉटेल नागपूर येथे प्रदान करण्यात आला आहे.
खरतर पुरस्कार सहजासहजी कोणालाही मिळत नाहीत.
पुरस्कार मिळणं ही साधी गोष्टही नाही, आणि पुरस्कार मिळाल्यानंतर वाढलेली जबाबदारी स्वीकारणे हेही सोपं नाही..
लक्ष्मण राठोड यांना पुरस्कार खरंतर का मिळाला असावा याची उत्तरे त्यांच्या रुग्णांनाच जास्त ज्ञात असावीत.
खरंतर गेल्या कोरोना काळापासून स्वतःला झोकून देत लक्ष्मण राठोड यांनी रुग्णांची अतोनात सेवा केली.
काही डॉक्टर दवाखान्यांमध्ये उत्तम सेवा देत रुग्णांना बरेही करत महत्त्वाची भूमिका बजावत असतात . त्यातच काही डॉ. फोनवर व व्हिडिओ च्या माध्यमातून लोकांना आरोग्यविषयक सल्ले देत असतात. त्याचप्रमाणे डॉ लक्ष्मण राठोड यांनीही आतापर्यंत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अर्थातच फोनवर व्हिडिओच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्षपणे दवाखान्याच्या माध्यमातून रुग्णांना आनंदी जीवन जगण्यास मार्ग दिला.

प्रामुख्याने ते आता केस गळणे,केसाला चाई/उंद्री लागणे केसांचा रंग बदलणे, टक्कल पडणे, त्वचाचे रोग, चेहऱ्याचे रोग यावर प्रामुख्याने इलाज करतात.
राठोड यांनी आतापर्यंत १० ते १५ रोगांच्या विषयांवर व्हिडिओ द्वारे जागृती व त्यावर घरच्या घरी उपाय कसे करावे यावर उपायही सांगितले आहेत.
त्याचप्रमाणे प्रतिकार क्षमता कशी वाढवावी, डेंग्यू, टायफाईड, मलेरिया, कावीळ, छातीतील पाणी कसे काढायचे, सलाईन कसे लावतात, विअग्र टॅबलेट चे शरीरावर होणारे परिणाम अश्या अनेक विषयावर त्यांनी सत्यवी क्लिनिक या यूट्यूब चॅनल वर टाकले आहेत. व अनेकांनी या यूट्यूब चॅनल ला भेट द्यावी असे त्यांनी आवाहन केले आहे.डॉ लक्ष्मण राठोड हे समाज माध्यमांद्वारे वेगवेगळ्या रोगांविषयी माहिती देत आहेत. व आणखी कोणालाही आरोग्याविषयी सल्ला घ्यायचा असेल तर ९६२३०५५५५० या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा अशी त्यांनी विनंती केली आहे.
डॉ. लक्ष्मण राठोड यांना भारत उद्योगरत्न पुरस्कार मिळाल्याने पंचक्रोशीतील लोकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Previous articleसाकोलीत हैवान मानवांचा मूक प्राण्यांवर राक्षसी अत्याचार
Next article_अटलजी ने आपले जीवन मजबूत, समृद्ध आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी समर्पित केले.._ _भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे_
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here