आशाताई बच्छाव
मुंबई विजय पवार कार्यकारी संपादक -बीडमध्ये श्री संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आज मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चा ची राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली. 28 डिसेंबरला बीडमध्ये मोर्चा घेण्याचे ठरले. त्याचप्रमाणे मुंबईतील उपस्थित मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी तेथेच बैठक घेऊन सदर घटनेचा निषेध व दोषींना अटक करून फाशीची शिक्षा व्हावी म्हणून बुधवार 25 डिसेंबर 2024 रोजी भारत माता लालबाग येथे सकाळी 11 वाजता निषेध आंदोलन करण्याचे ठरवले आहे तरी मुंबईतील सर्व आंदोलकांनी भारत माता लालबाग येथे सकाळी अकरा वाजता जमावे.