आशाताई बच्छाव
घोडेगाव शिवारात बनावट दारू कारखाना उध्वस्त!
(राजेंद्र पाटील राऊत
मालेगाव:- नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या घोडेगाव शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाने टाकलेल्या छाप्यात बनावट दारू बनविणारा कारखाना उध्वस्त केला आहे.
आगामी एकतीस डिसेंबर व ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने हि कारवाई केली.घोडेगाव शिवारात असलेल्या या बनावट दारू कारखान्यातुन देशी, विदेशी तयार केला जाणारा बनावट दारू कारखाना उध्वस्त केला.यावेळी चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून, सुमारे सत्तर लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पुढील कारवाई सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले.