आशाताई बच्छाव
शनिदर्शनासाठी भक्तांची मांदियाळी
कडाक्याच्या थंडीतही भाविकांची पहाटेच्या आरतीला गर्दी. नेवासा -अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी
शनिशिंगणापुरात आज दिवसभरात दोन लाख भाविकांनी शनिदर्शनाचा लाभ घेतला. वाहनांच्या प्रचंड गर्दीने गावात] तसेच सोनई व घोडेगाव रस्त्यावर अनेकदा वाहतुकीची कोंडी होऊन ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी व भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
शनिवारी पहाटे साडेचार वाजता होणाऱ्या आरती सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी अनेक भक्त मुक्कामी थांबले होते. कडाक्याची थंडी असताना
पहाटेच्या आरतीला हजारो भाविक उपस्थित होते. मुख्य पुरोहित अशोक कुलकर्णी यांनी अभिषेक, पूजन, तेल अर्पण करून आरती केली.
उपस्थित भक्तांनी ‘शनिदेव की जय’ व ‘पवनपुत्र हनुमान की जय’चा जयघोष केला. दुपारी झालेल्या मध्यान्ह आरतीला चौथरा परिसर गर्दीने फुलून गेला होता. शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने आरोग्य, रुग्णवाहिका, पिण्याचे पाणी, प्रसाद, दर्शन व्यवस्था आदी सुविधा देण्यात आल्या. परराज्यांतोल दानशूर भक्तांनी चहा, नाश्ता व महाप्रसाद वाटप केले.