आशाताई बच्छाव
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याच्या
निषेधार्थ शिवसेनेची तीव्र निदर्शने
जालना, दि. २०( दिलीप बोंडे ब्युरो चीफ)-देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या कथित अवमानकारक उल्लेखाचा
जालना जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मस्तगड
येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर प्रचंड
घोषणाबाजी व निदर्शने करून शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर
यांच्या नेतृत्वात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख बाबुराव पवार, शहरप्रमुख बाला परदेशी, घनश्याम
खाकीवाले, दुर्गेश काठोठीवाले,संघटक विजय पवार, माजी नगरसेवक गंगुताई
वानखेडे, जे.के.चव्हाण, संजय रत्नपारखे, रवीकांत जगधने, डॉ.राजेश राऊत
आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांसमोर बोलताना जिल्हाप्रमुख
भास्करराव अंबेकर म्हणाले की, ज्या महामानवाने देशाची राज्यघटना लिहिली व
देशातील सर्व जाती धर्माच्या तमाम देशवासीयांना समान अधिकार मिळवून
प्राप्त करून दिले. त्यांच्याविषयी अमित शहा यांनी केलेले वादग्रस्त व
अवमानकारक वक्तव्य हे अत्यंत दुर्दैवी आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करून
त्यांनी त्यांच्या मनातील या महामानवासंबंधीची भावना बोलून दाखवलेली आहे.
पतप्रधानांनी अशा वक्तव्याची दखल घ्यावी. अशी जोरदार मागणी यावेळी
पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी केली. यावेळी
रविकांत जगधने, संदीप झारखंडे, संदीप नाईकवाडे, चेतन भुरेवाल, अनिल
अंभोरे,सखावत पठाण, दर्शन चौधरी, सोनाजी खांडेभराड, किशोर नरवडे,गणेश
लाहोटी,जान मोहम्मद कुरेशी,वसंत घुगे,तुकाराम भुतेकर,रामेश्वर
कुरील,संतोष क्षत्रिय, सनी साठे, श्रीनिवास उगले, प्रल्हाद पवार, जावेद
सय्यद,योगेश जाधव, रमेश तुंगेवार,नरेश जगधने, शिवा मुळे, आदी उपस्थित होते.