Home उतर महाराष्ट्र आजपासून मुळा धरणातून सुटणार पाण्याचे आवर्तन

आजपासून मुळा धरणातून सुटणार पाण्याचे आवर्तन

245

आशाताई बच्छाव

1001064127.jpg

नेवासा -अहिल्यानगर कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी –आजपासून मुळा धरणातून सुटणार पाण्याचे आवर्तन
मुळा उजव्‍या कालव्‍यातून आज पासून आवर्तन सोडण्‍याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. या संदर्भात मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत झालेल्‍या बैठकीत आवर्तनाचे वेळापत्रक निश्चित करण्‍यात आले. मुळा धरणातून पाण्‍याचे आवर्तन मिळावे अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली होती. याचे गांभिर्य लक्षात घेवून मंत्री विखे पाटलांनी जलसंपदा विभागाच्‍या आधिकाऱ्यां समवेत नागपूर येथे बैठक घेतली.
या बैठकीला आमदार शिवाजी कर्डिले, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार मोनिका राजळे, आमदार काशिनाथ दाते यांच्‍यासह जलसंपदा विभागाच्‍या कार्यकारी अभि‍यंता यांच्‍यासह अन्‍य आधिकारी उपस्थित होते. बैठकीत झालेल्‍या निर्णयानुसार मुळा उजव्‍या कालव्‍यातून १९ डिसेंबर २०२४ रोजी लाभक्षेत्रासाठी पाणी सोडण्‍यात येणार असून, ३५ दिवसांचे आवर्तन निश्चित करण्‍यात आले असल्‍याचे कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी सांगितले.

Previous articleदान केल्याचे कोणाला सांगू नका : राऊत महाराज
Next articleमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आगमन दिनाला बाबासाहेबांचे नातू भीमराव आंबेडकर उपस्थित
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.