Home नांदेड युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित रहावे –...

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित रहावे – राष्ट्रीय अध्यक्ष :- गणेश कचकलवार

130

आशाताई बच्छाव

1001052022.jpg

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित रहावे – राष्ट्रीय अध्यक्ष :- गणेश कचकलवार

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड -६ जानेवारी २०२५ पत्रकार दिनानिमित्त नागपूर येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित*

नवीन वर्षाच्या सुरुवातीला ६ जानेवारी २०२५ रोजी नागपूर येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अधिवेशन घेण्याचे ठरले असून राज्यभरातील सर्व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी अधिवेशनाला उपस्थित रहावे असे आवाहन युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी केले आहे.अल्पवाधितच फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशभरात युवा ग्रामीण पत्रकार संघटनेची बांधणी करून कमी वेळेत आपल्या कार्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त सदस्य संघटनेला जुळविले व संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशभरात युवा ग्रामीण पत्रकार संघ कार्यरत आहे.समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर हे ब्रिद वाक्य समोर ठेवून एक वर्षाआधी युवा ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली.
एवढ्या कमी वेळेत देशभरातील पत्रकारांना संघटनेशी जुळवून त्यांच्या अडिअडचणी व समस्या सोडवून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सदैव त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहण्याचे काम युवा ग्रामीण संघ करत आहे.नवीन वर्षाच्या सुरुवातीला ६ जानेवारी २०२५ रोजी नागपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाला सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित रहावे.असे आवाहन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी केले आहे.

Previous articleमंत्रीमंडळ शपथविधी… कुणाची लागली वर्णी आणि कुणाला मिळाला डच्चू
Next articleआडवीहीर फाट्याजवळ अपघात., दोन जण ठार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.