Home नांदेड विशाल मोघे यांची जिल्हा सत्र न्यायालय मुंबई येथे लिपिकपदी निवड

विशाल मोघे यांची जिल्हा सत्र न्यायालय मुंबई येथे लिपिकपदी निवड

107

आशाताई बच्छाव

1001048156.jpg

विशाल मोघे यांची जिल्हा सत्र न्यायालय मुंबई येथे लिपिकपदी निवड
— ——
देगलूर गजानन शिंदे तालुका प्रतिनिधी: जिल्हा सत्र न्यायालय मुंबई येथे लिपिकपदी विशाल शंकरराव मोघे रा.सांगवी( क) यांची निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंबीयांमध्ये तसेच त्यांचे मित्रमंडळींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

विशाल यांनी आपल्या कठोर मेहनती व चिकाटीच्या जोरावर ही यशस्वी कामगिरी साध्य केली आहे. शिक्षण संपवून न्यायालयीन क्षेत्रात काम करण्याची त्यांची इच्छा होती, आणि त्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

लिपिकपदासाठी घेतलेल्या परीक्षेत त्यांनी उत्तम कामगिरी करून हे पद मिळवले आहे. त्यांची ही निवड कौटुंबिक तसेच सांगवीवासीयांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

विशाल यांनी त्यांच्या यशाचे श्रेय कुटुंबीयांच्या पाठिंब्याला व नियमित अभ्यासाला दिले आहे. त्यांची पुढील वाटचाल यशस्वी होवो, अशी सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Previous articleभक्तीचा भाव भावस्पर्शी असावा : गोविंद महाराज
Next articleमाझी वंसुधरा अभीयान ५.० ग्रामपंचायत रावणवाडी ची सेंद्रिय शेतीकडे वाटचाल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.