Home नाशिक टिंगरीत शासकीय कर्मचाऱ्यांकडून आचारसंहिता भंग

टिंगरीत शासकीय कर्मचाऱ्यांकडून आचारसंहिता भंग

350

Yuva maratha news

1000949826.jpg

टिंगरीत शासकीय कर्मचाऱ्यांकडून आचारसंहिता भंग
मालेगाव – मालेगाव तालुक्यातील टिंगरी येथील विकास हायस्कुलचे कर्मचारी देवमन नारायण भामरे या शासकीय कर्मचाऱ्यांने आचारसंहितेचे उल्लंघन करुन आदर्श आचारसंहिता भंग केल्याची तक्रार टिंगरी ग्रामस्थांनी निवडणूक आयोगाकडे केली असल्याची माहिती मिळाली आहे.
प्राप्त माहितीनुसार देवमन नारायण भामरे यांनी उमेदवारांच्या रँलीत सहभागी होत व संपूर्ण टिंगरी गावातून घोषणाबाजी करीत सहभाग घेतल्याने ग्रामस्थांनी पुराव्यानिशी निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याने ,टिंगरी गावी निवडणूक आयोगाचे भरारी पथक दाखल झाले.यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी गावकरी करीत होते.