आशाताई बच्छाव
सलग ९ वेळा शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावून मिलेनियम नॅशनल स्कूलने रचला इतिहास!
नागपूर , प्रतिनिधी दिपक कदम
:क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल १७ वर्षा खालील मुले- मुली स्पर्धाचे आयोजन नागपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर व नागपूर जिल्हा वॉलीबॉल संघटना यांच्या वतीने दिनांक ३ ते ५ ऑक्टोबर २०२४ रोजी करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये मुलींमध्ये पुणे विभागाचे नेतृत्व करताना मिलेनियम नॅशनल स्कूल,पुणे संघाने अमरावती,नागपूर, कोल्हापूर संघांना पराभव करत विजेतेपद पटकावले.उपांत्य फेरीच्या लढतीत नागपूर विभागा विरुद्ध एकतर्फी झालेल्या सामन्यात पुणे विभाग संघाने २५-०९, २५-०८ व २५-१० ने विजय मिळवून अंतिम सामन्यात प्रवेश केला.कोल्हापूर विभागाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात देखील पुणे विभाग संघाने व्हॉलीबॉल खेळामध्ये राज्यात आपले वर्चस्व सिद्ध करताना कोल्हापूर संघाचा २५-०८,२५-१० व २५-०८ ने पराभव करून ९ व्या वेळेस राज्य स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विजेत्या संघाकडून सानिका केळकर,गीत सागजकर,अहाना ठकार, सौमिनी बॅनर्जी,अन्वी गोसावी,संजना गोठस्कर, सई दांगट, आरना शेषन, उपन्या कार्ले
यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. विजयी संघास राष्ट्रीय प्रशिक्षक श्री कुलदीप कोंडे,श्री सचिन चव्हाण, शिवाजी जाधव,पंकज शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.संस्थेचे संचालक श्री अन्वित फाठक,अंचिता भोसले,सचिन गायवळ आणि रामदास लेकावळे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.