आशाताई बच्छाव
पाथ्रीकर कॅम्पसच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या कब्बडी स्पर्धेत बाजी
बदनापूर, दि.४(प्रतिनिधी दिलीप बोंडे)-येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या
कब्बडी संघाने आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत बाजी मारली असून विद्यापीठात
हा संघ सर्वप्रथम आला आहे. ग्रामीण भागातील या महाविद्यालयाने आपल्या
यशाची परंपरा कायम राखत मिळवलेल्या या यशाबद्दल संघाचे सर्वत्र कौतुक होत
आहे.
निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टद्वारे पाथ्रीकर कॅम्पस, बदनापूर
येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने कायम विविध क्रीडा प्रकारात
बाजी मारलेली आहे. या महाविद्यालयातील कब्बडी संघाने मागील अनेक
वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केलेली आहे. प्रत्येक
वर्षी या महाविद्यालयातील अनेक खेळाडू राष्ट्रीयस्तरावर चमकत असतात.
ग्रामीण भागात असलेल्या या महाविद्यालयाने संस्थेचे अध्यक्ष डॉ.देवेश
पाथ्रीकर व क्रीडा संचालक डॉ. एस. एस. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली
क्रीडा क्षेत्रात प्रचंड दबदबा निर्माण केलेला आहे. या वर्षीची आंतर
महाविद्यालयीन कब्बडी स्पर्धा अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना येथे
संपन्न झाल्या.
या स्पर्धेतही पाथ्रीकर कॅम्पसच्या संघाने पुन्हा बाजी मारली असून सांघीक
खेळाच्या जोरावर बाजी मारत सर्वप्रथम क्रमांक मिळवला. या संघाला क्रीडा
विभागप्रमुख डॉ. नाजमा खान यांचे मार्गदर्शन लाभले होते. तर या संघात
पठाण सोहेल खान, आशीष विष्णू जाधव,नितीन जाधव, विनोद चव्हाण,समाधान
थाले, जावेदखान पठाण, आशीष सिध्दार्थ जाधव, मदन लाला झा, साईराज
कुंभार, कुशल अय्यर कीर्तीवासन अय्यर, शंकर भंडारे, सुभाष दलसिंग या
विद्यार्थ्यांचा सहभाग होता.