Home बुलढाणा विवाहितेच्या घरी जावून केला विनयभंग आरोपी विरुध्द गुन्हा दाखल

विवाहितेच्या घरी जावून केला विनयभंग आरोपी विरुध्द गुन्हा दाखल

123

आशाताई बच्छाव

1000804253.jpg

विवाहितेच्या घरी जावून केला विनयभंग आरोपी विरुध्द गुन्हा दाखल
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- देऊळगाव राजा तालुक्यातील घरात एकटीला पाहून आरोपीने वाईट उद्देशाने विवाहितेचा हात धरून तिचा विनयभंग केला अशा एका महिलेच्या तक्रारी वरुण पोलिसांनी १ ऑक्टोबर रोजी आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील ३० वर्षांय विवाहितेने तक्रारी मध्ये नमूद केले की घरात एकटी असतांना आरोपी हा विवाहिते जवळ येवून म्हणाला की तुझे पतीचे माझा पत्नी सोबत अफेयर आहे आणि आता असे तू पण माझा सोबत चल असे, म्हणून वाईट उद्देशाने हात धरून विनयभंग केला. अशा महिलेच्या तक्रारी वरुण पुलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डायरी अमलदार रामेश्वर आंधळे यांनी आरोपी सुभाष राजकुमार शेळके यांच्या विरूध्द अप नं. २५९/२०२४ कलम ७४ , ३५१ (३) , ३५२ बिएनएस नुसार गुन्हा दाखल करून तपास बिट जमादार सिद्धार्थ सोनकांबळे यांच्याकडे सोपविण्यात आहे .

Previous articleजिल्ह्याचा केवळ आठ महिन्यातच विकास झाला ही बाब संयुक्तीक कशी?
Next articleसरस्वती माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.