आशाताई बच्छाव
सोनई महाविद्यालय अंतर्गत स्वच्छता उपक्रम संपन्न… नेवासा -अहिल्यानगर कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी -मुळा एज्युकेशन सोसायटीचे, कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनई या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने आज दिनांक १ ऑक्टोबर २०२४ रोजी स.१०:३० वा. *स्वच्छता ही सेवा* या कार्यक्रमांतर्गत सोनई गावात विविध ठिकाणी स्वच्छता उपक्रम पार पाडला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांची स्वच्छता फेरी काढली. या स्वच्छता फेरीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ही स्वच्छता फेरी ग्रामीण रुग्णालय सोनई येथे आली. या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे यांनी विद्यार्थ्याना स्वच्छतेबद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यानी ग्रामीण रुग्णालय परिसरात स्वच्छता केली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे १२५ विद्यार्थी उपस्थित होते, या कार्यक्रमासाठी डॉ. बाळासाहेब खेडकर, प्रा. शरद औटी, प्रा. महेश ताके, प्रा. कावेरी ढोकणे, डॉ. विशाल फाटके, डॉ. तुकाराम जाधव, प्रा. विशाल पवार , प्रा. रूचिका लांडे त्याचबरोबर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.