Home जालना शिवसेना महिला आघाडी मजबुत करा – उपनेत्या संजना घाडी शिवसेना महिला आघाडीची...

शिवसेना महिला आघाडी मजबुत करा – उपनेत्या संजना घाडी शिवसेना महिला आघाडीची बैठक संपन्न

24
0

आशाताई बच्छाव

1000787952.jpg

शिवसेना महिला आघाडी मजबुत करा – उपनेत्या संजना घाडी
शिवसेना महिला आघाडीची बैठक संपन्न
जालना, दि. २७(प्रतिनिधी)- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)  पक्षाच्या
महिला आघाडी जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने जालना शहरातील शिवसेना भवनात
`स्त्रीशक्ती संवाद’ मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपनेत्या
संजना घाडी, उपनेत्या अस्मिता गायकवाड, पक्ष निरीक्षक प्रियंका घाणेकर व
सोनम जामसुदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज २७ सप्टेंबर रोजी करण्यात आले
होते. यावेळी जिल्ह्यातील जालना, बदनापूर, भोकरदन, परतुर, घनसावंगी
विधानसभा मतदार संघांतील महिला पदाधिकार्‍यांचा आढावा घेतला.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर,
उपजिल्हाप्रमुख रमेश गव्हाड, उपजिल्हाप्रमुख बाबुराव पवार, तालुकाप्रमुख
हरिहर शिंदे, वैâलास पुंगळे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक मंगल मेटकर,
सुमनताई घुगे, गंगुताई वानखेडे, आयोध्या चव्हाण, शितल गव्हाड, मंजुषा
घायाळ, शोभा पुंगळे, पुजा टेहरे आदींची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित महिला पदाधिकार्‍यांशी संवाद साधतांना उपनेत्या संजना
घाडी म्हणाल्या की, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष महिलांचा
प्रचंड आदर सन्मान करणारा पक्ष आहे. महिलांनी मोठ्या संख्येने
जिल्ह्यातील संघटन मजबुत करावे. एकुण मतदार संख्येत  महिलांची संख्या ही
निम्मी आहे. त्यामुळे पुरुषांच्या बरोबरीनेच महिलांचे संघटनही बळकट असणे
गरजेचे आहे. आगामी काळात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना पुन्हा
मुख्यमंत्रीपदी बसवयाचे आहे. त्या दृष्टीने आपण सर्वांनी कामाला लागणे
गरजेचे आहे. राज्यात वाढलेली महागाई, बेरोजगारी, महिलांवरील वाढते
अत्याचार याचा उल्लेख करुन त्यांनी आपल्या खास शैलीत सत्ताधार्‍यांचा
खरपूस समाचार घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here