आशाताई बच्छाव
बाप्पांचा विसर्जन सोहळा
19/09/2024 निरोप घेताना बापांचा विचार तुम्ही सर्व माझे मुलं फुल माझ्या येता ही चांगला सत्कार केला जाताही भरमसाठ आवाजाच्या जयघोषात जसे त्रिलोकात निनादात सन्मानानं बिदाई !……पण काही माझा विचार सांगावे से वाटते ते असे ,
माझ्या आगमनामध्ये व बिदाई मध्ये आपण जर पारंपारिक खेळ किंवा नृत्य जसे मलखांब ,डबलबार, तलवारबाजी ,लाठीकाठी , लेझीम ,डंबेज खेळ ,झांज पथक, दिंडी पखवाद नृत्य, भजन मंडळ, काही कलापतके काही नाटके ,अशाप्रकारे जनजागृती व्हावी या उद्देशाने किंवा माझ्या आगमनानंतर दहा दिवस पर्यंत काही सुसंस्कृत देखावे ज्याने पुन्हा या पृथ्वीवर संस्कृतीचा उदय होईल ज्याने येणारी पिढी मध्ये सनातन धर्म हिंदू धर्म जागृत होईल व वाचून राहील पूर्वी कालिया मर्दन ,द्रौपदी वस्त्रहरण ,भीष्म पितामह विचार, कृष्ण अर्जुन संवाद, महादेव पार्वतीचे आत्मचरित्र, अन्य कथा ,कला कौशल, रामायणातील दृष्टांत ,अशा प्रकारे हिंदू संस्कृती वाचेल , जसे जिजाबाई पोटी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला ,असे छत्रपती शिवरायांची आता या पृथ्वीतलावर आज गरज आहे. असे सु शासनाची गरज आहे. म्हणून का होईना , अशाच माता अहिल्या बाई होळकर यांच्या पराक्रम दिल्लीपासून गल्लीपर्यंत गाजलेला आहे तसेच , झाशीची राणी यांच्या शौर्य गाथा कहानी कथा आज प्रत्येक माता माऊलीला झाशीची राणी सारखे शिक्षण काळाची गरज आहे .असे बनवायचे आहे की त्या आपल्या स्वतःचे आत्मसन्मान जपतील वेळप्रसंगी समोर कोणीही हैवान असो त्या हैवनाला त्याच्या कुकर्माची येता योग्य दंड शिक्षा वेळीच देण्याची शक्ती अशा सर्व माझ्या माता माऊलींना भक्तांना पराक्रमी बुद्धी प्रदान होवो अशा माझा विचारांचा तुम्ही अंगीकृत करावे पुढच्या वर्षी येण्याआधी आपण सर्वजण समजदार ,सक्षम ,ज्ञानी, पराक्रमी ,झालेले दिसले , तर मला असे वाटेल की पुढे सनातन हिंदू धर्म संस्कृती वाचेल यात शंका नाही
खरंतर ध्वनी प्रदूषण नियंत्रण ही काळाची गरज आहे. पारंपारिक वाद्याने माझे पुढच्या वर्षी आगमन व बिदाई करावी अशी माझी स्वतःची विनंती आहे. कारण मला अग्रीम बुद्धीचा दाता तुम्ही मानता या सदबुद्धीने तुम्हाला यश मिळते .या यशा चा दुरुपयोग झाला तर तुमच्या आर्थिक उन्नतीचे हानी होते. नुकसान तुमचे होते .आणि दुखी मी होतो .तर मला पुढच्या वर्षी पारंपारिक पद्धतीने संस्कृतीने पारंपारिक वाद्यानेच माझे आगमन व बिदाई करावी म्हणजे माझ्याकडून तुम्हाला सुख ,समृद्धी ,आयु ,आरोग्य, ऐश्वर्य , लाभेल हेच तुम्हा भक्तांना आशीर्वाद व विनंती आपला,! श्रीगणेश , श्रीगजानन , श्रीगणपती, जय सनातन धर्म की जय
आपला धर्म रक्षक पंडीत:-विष्णुदास दायमा 89 75 34 1005