Home राजकीय नांदगाव मतदार संघातून राजेंद्र पाटील राऊत राष्ट्रीय मराठा पार्टीकडून इच्छुक

नांदगाव मतदार संघातून राजेंद्र पाटील राऊत राष्ट्रीय मराठा पार्टीकडून इच्छुक

129
0

आशाताई बच्छाव

1000686680.jpg

नांदगाव मतदार संघातून राजेंद्र पाटील राऊत राष्ट्रीय मराठा पार्टीकडून इच्छुक
(प्रविण क्षीरसागर प्रतिनिधी)
मालेगाव:- आगामी होणा-या विधानसभा निवडणुकीसाठी नांदगाव मतदार संघातून कौळाणे (नि) येथील रहिवासी राजेंद्र पाटील राऊत हे राष्ट्रीय मराठा पार्टीकडून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असून,या निवडणुकीत राष्ट्रीय मराठा पार्टीने तिसरी आघाडी स्थापन केलेली असून,सर्व जाती धर्म समावेशक या तिसऱ्या आघाडीत सहभागी झाल्याने या निवडणुकीत राष्ट्रीय मराठा पार्टीला भरघोस यश मिळेल असा मनोदय राजेंद्र पाटील राऊत यांनी व्यक्त करतानाच या मतदारसंघातील नागरिकांशी आपले अत्यंत जवळून जनसंपर्क असल्याने पक्षाकडून आपण उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असल्याचे राजेंद्र पाटील राऊत यांनी निश्चित करताच या मतदारसंघातील नागरिकांत नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.कौळाणे (नि) येथील रहिवासी असलेले राजेंद्र पाटील राऊत हे राष्ट्रीय मराठा पार्टीचे उतर महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून सन २०१८ पासून कार्यरत आहेत.तर युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तर आश्रयआशा फाऊंडेशन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्याशिवाय युवा मराठा न्यूजपेपर्स अँन्ड वेब न्यूज चॅनलचे मुख्य संपादक म्हणून कार्यरत असल्याने त्यांना या मतदारसंघातील विविध समस्यांची अगदी जवळून माहिती असून,या मतदारसंघातील प्रत्येक वाडी वस्तीवर त्यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने पक्षाकडून आपण ही निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

Previous articleजानेफळ पंडित गावात रात्रीच्या वेळी ड्रोन कॅमेऱ्याच्या घिरट्या, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Next articleजिल्हा मध्यवर्ती बँकेकडून खातेदारांना एटीएम वाटप सुरू
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here