Home उतर महाराष्ट्र पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे लोकोपयोगी कार्य हेच त्यांचे स्मरण – प्रा. डॉ....

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे लोकोपयोगी कार्य हेच त्यांचे स्मरण – प्रा. डॉ. भिंगे

24
0

आशाताई बच्छाव

1000730639.jpg

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे लोकोपयोगी कार्य हेच त्यांचे स्मरण – प्रा. डॉ. भिंगे

श्रीरामपूर (दिपक कदम तालुका प्रतिनिधी)- १८ व्या शतकात लोकोत्तर कार्य करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विवेकशील चरित्राचा वसा आणि वारसा जपला पाहिजे. त्यांनी प्रतिकूल वातावरणात लोकोपयोगी विविधांगी कार्य केले, तेच त्यांचे चिरंजीव स्मारक व स्मरण होय, असे विचार नांदेड येथील पिपल्स कॉलेजचे प्रा.डॉ. यशपाल भिंगे यांनी व्यक्त केले. येथील स्वयंवर मंगल कार्यालयात यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २२९ व्या पुण्यतिथी निमित्त प्रबोधन व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. बाबुराव उपाध्ये होते. तर माजी प्राचार्य टी.ई. शेळके, वाणिज्य विभागाचे अभ्यासक प्रा. शिवाजीराव बारगळ उपस्थित होते. यशवंत नागरी पतसंस्थेतर्फे मान्यवरांचा सन्मान काण्यात आला. यावेळी माजी आ. भाऊसाहेब प्राचार्य डॉ. शंकरराव कांबळे, गागरे, प्रा. शिवाजीराव बारगळ, प्रकाशराव करडे यांनी मनोगत व्यक्त केले, प्रसंगी अॅड. लोणे, डॉ ज्ञानेश्वर राहींज, सुखदेव सुकळे , प्रा. शिवाजीराव काळे, लक्ष्मण खाटेकर, सचिन काळे, गोरख बाराहाते उपस्थित प्रा. डॉ. होते. कार्यक्रमासाठी यशवंत पतसंस्थेचे अध्यक्ष साहेबराव रक्टे, उपाध्यक्ष मधुकरराव सातव, संचालक मोठ्याभाऊ दातीर,
प्रकाशराव करडे, बाळासाहेब लांडे, अंशुमन वाकचौरे, श्रीमती सुरेखाताई सुरेशराव सातव, मनिषाताई आदिनाथ गवळी, गुलाबराव पादीर, वसंतराव बारगळ, एकनाथराव खेडेकर, गजानन पुंड, दत्तात्रय गावडे, रावसाहेब करडे, व्यवस्थापक माधव निंबाळकर आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक साहेबराव रक्टे, आभार उपाध्यक्ष मधुकर सातव यांनी मानले. तर सूत्रसंचालन संतोष मते यांनी केले. कार्यक्रमास सर्व सेवक, बचत गट आणि नागरिकउपस्थित होते.
श्रीरामपूर यशवंत नागरी पतसंस्थेच्यावतीने लोकमाता
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी कार्यक्रमाचे
दीपप्रज्वलन करताना विविध मान्यवर. (छाया अमोल कदम)

Previous articleसंतांचे विचार खऱ्या अर्थाने समाजात रिपोस्ट करायचे काम अभंग रिपोस्ट करत आहे – आमदार मंगेश चव्हाण
Next articleक . जे . सोमैया विद्यालयास आ . सत्यजीत तांबे यांची सदिच्छा भेट .
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here