Home नांदेड आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य या संस्थेद्वारा आयोजित भव्य...

आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य या संस्थेद्वारा आयोजित भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण संकल्पपूर्ती सोहळा संपन्न.

225

आशाताई बच्छाव

1000729532.jpg

आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य या संस्थेद्वारा आयोजित भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण संकल्पपूर्ती सोहळा संपन्न.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड मारतळा -दि.०९ सप्टेंबर २०२४ रोजी आम्ही वारकरी परिवारातर्फे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण संकल्पपूर्ती सोहळा यावर्षी साजरा करण्यात आला.आम्ही वारकरी परिवाराने मागील सात वर्षांपासून अवघ्या ४२ साधकांपासून सूरु केलेला पारायण साधकांचा इतिहास यावर्षी ९५४२ इथपर्यंत येऊन पोहोचला.
ज्ञानेश्वरीतील जेवढ्या ओव्या तेवढे साधक जोडण्याचा आम्ही वारकरी परिवाराचा संकल्प होता. तो यावर्षी सिद्धीस गेला. या कार्यक्रमासाठी गुरुवर्य तेलंगणाभूषन नारायण महाराज माधापुरीकर यांनी संस्कार,संस्कृती ,सूरक्षा याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
गुरुवर्य नराशाम महाराज येवतीकर, गुरुवर्य प्रयागगिरी महाराज डोलारा, गुरुवर्य ब्रम्हानंद सरस्वती महाराज तेलूर व इतर सर्व सन्माननीय या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्यांनी ज्ञानेश्वरी ची फलश्रुती सांगितली.या कार्यक्रमामध्ये हभप राम महाराज पांगरेकर यांनी आम्ही वारकरी परिवाराचा इतिहास त्यांनी त्यांच्या प्रास्ताविकात सांगितला. हा पारायण सोहळा २०१८ या वर्षी सूरु करण्यात आला..हा अमृतमय प्रवास ९५४२ साधक इथपर्यंत पर्यंत कसा पोहोचला हे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
राम महाराज पांगरेकर यांनी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात स्थापन झाली आणि या संस्थेच्या माध्यमातून पंढरपूर येथे गोरगरीब वारकऱ्यांसाठी धर्मशाळा उभी करण्यासाठी जागा घेण्यात आली व लवकरच धर्मशाळा पूर्णत्वास नेण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला.
ज्ञानेश्वरीच पारायण दरवर्षी याच पद्धतीने आपल्याच घरी करावयाच आहे आणि सांगता सोहळ्याला सर्वजण मारतळा येथे एकत्र जमून सोहळा पार पाडायचा आहे असे त्यांनी सुचविले.
हा सोहळा संपन्न करण्यासाठी आम्ही वारकरी परिवारातील राज्यस्तरीय, जिल्ह्यास्तरीय, तालुकास्तरीय, महिला आघाडी, गाव स्तरावरील अनेकांनी अहोरात्र मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या संस्थेचे मार्गदर्शन रावसाहेब पा शिराळे, दत्ताराम पा एडके, रामजी पा शिंदे, व्यंकटराव पा कपाटे, दत्तरामजी गोरठेकर, व्यंकटराव पा ढगे, गंगाधर पा भरकडे, शिवाजी पा हातने व संस्थेचे सल्लागार, संस्थेचे सचिव संस्थेचे सर्व संस्थापक सदस्य, संस्थेचे सर्व तालुका अध्यक्ष, तालुकास्तरीय सर्व पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले.
आम्ही वारकरी परिवाराचे ध्येय उद्देश घरा घरात पोहोचवण्यासाठी आम्ही वारकरी परिवाराची मल्टिमीडिया टीम या टीमचे विशेष सहकार्य लाभले. यांच्यामुळे आम्ही वारकरी परिवार घराघरात पोहोचवला हे त्यांनी सांगितले. साधकांची नावे घेणे, याद्या तयार करणे, ग्रुप तयार करणे, प्रत्येक साधकांना मॅसेज करणे, प्रत्येक साधकांना कॉल करने, देणगी जमा करणे, देणगीचा हिशोब ठेवणे या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केल्या. त्याचबरोबर अवघ्या सहा महिन्यांच्या आत संस्थेकडे साधारणत: एकविस लाख रुपये देणगीच्या माध्यमातून जमा झाले. त्यापैकी नऊ लाख रुपये संस्था स्थापन झाल्यापासून सांगता सोहळ्याच्या कार्यक्रमापर्यंत खर्च झाले व उर्वरित रक्कम धर्म शाळेच्या जागेसाठी शिल्लक ठेवलेली आहे असे त्यांनी सांगितले. सर्व गुरुवर्यांनी आपल्या मनोगतामध्ये ज्ञानेश्वरी का वाचावी? ज्ञानेश्वरीची फलश्रुती काय आहे? ज्ञानेश्वरी म्हणजे जीवनाचा आधार आहे. आपल जीवन समृद्ध, सुसंपन्न करायच असेल तर ज्ञानेश्वरी शिवाय पर्याय नाही असे सर्व साधुसंतांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संस्थेचे सचिव व्यंकटराव पा माळकौठेकर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी मामा मंगल कार्यालयाचे मालक निरंजन पा. कौडगावकर यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या सर्व देखरेखीसाठी कौडगाव येथील मंडळी व मारतळा परिसरातील सर्व मंडळी यांनी विशेष सहकार्य केलं सर्वांच्या सहकार्यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.