Home रायगड अलिबागमध्ये बेकायदा कॉल सेंटरचा पर्दाफाश, पोलिसांच्या कारवाईत ३५ जणांना अटक

अलिबागमध्ये बेकायदा कॉल सेंटरचा पर्दाफाश, पोलिसांच्या कारवाईत ३५ जणांना अटक

186

अलिबागमध्ये बेकायदा कॉल सेंटरचा पर्दाफाश, पोलिसांच्या कारवाईत ३५ जणांना अटक

पोलिसांनी केलेल्या कारवाई ३५ जणांना अटक करण्यात आली असून ८५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

युवा मराठा न्यूज रायगड ब्यूरो चीफ :- मुजाहीद मोमीन

अलिबाग : व्हायग्रा, सियालिस, लिविट्रो ही अमेरिकेत बंदी

असलेली औषधे घरपोच देण्याचे आमिष दाखवत थेट अमेरिकी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश अलिबाग पोलिसांनी केला आहे. त्यासाठी येथील एका रिसॉर्टमध्ये बेकायदा कॉल सेंटरची निर्मिती करण्यात आली होती.

पोलिसांनी केलेल्या कारवाई ३५ जणांना अटक करण्यात आली असून ८५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुख्य आरोपी मात्र फरार आहे. अटक केलेले आरोपी हे परराज्यातील असून, २५ ते ३० वयोगटातील आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. परहूर येथील नेचर एज अलिबाग या रिसॉर्टमध्ये काही संशयास्पद हालचाली सुरू असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती.

आवास येथेही होते सेंटर

परहूरसोबतच आवास येथेही ऑनलाइन कॉल सेंटर सुरू होते. परहूर येथे कारवाई झाल्याचे कळताच आवास येथील आरोपी फरार झाले आहेत. मात्र, येथील फैज आरिफ शेख, महमंद अझहर अन्सारी या दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत मांडवा सागरी पोलिस पुढील तपास करत आहेत.

अलीकडेच सुरू झालेल्या या रिसॉर्टमध्ये बेकायदा कॉल सेंटर सुरू असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी रात्री पोलिसांनी सापळा रचत रिसॉर्टवर कारवाई केली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

अशी होत होती फसवणूक

इंटरनेटच्या साहाय्याने अमेरिकी नागरिकांशी संपर्क साधून यू. एस. फार्मा या कंपनीच्या नावाने प्रतिनिधी जॉन बोलत असल्याचे सांगून अमेरिकेत बंदी असलेल्या व्हायग्रा, सियालिस, लिविट्रो या गोळ्या घरपोच देण्याचे आमिष दाखवले जात होते.

यासाठी ग्राहकाला पेमेंटसाठी गिफ्ट कार्डचा वापर करायला सांगून कोणाच्या तरी साहाय्याने रिडीम करून ते पेमेंट हवालाद्वारे मुख्य आरोपी रोहित बुटाने याच्याकडे जमा होत होते. मात्र, ग्राहकाला औषध दिले जात नव्हते.

बुटाने फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईत ३१ संगणक, लॅपटॉप, हेडफोन, ५ चारचाकी, १ दुचाकी, वायफाय युनिट मोडेम व इतर लाकडी फर्निचर, ५५ मोबाइल असा ८५ लाख ४५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यांनी केली कारवाई

जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलिस अधिकारी विनीत चौधरी यांच्या सूचनांनुसार पोलिस निरीक्षक किशोर साळे, सायबर सेलचे पोलिस निरीक्षक अभिजित भुजबळ, पोलिस उपनिरीक्षक युवराज मराठे, सहायक फौजदार प्रशांत पिंपळे, संतोष पाटील, पोलिस हवालदार हनुमंत

Previous articleबदलापूर प्रकरणः शाळा, पोलिसांकडून पीडितेच्या पालकांचा ‘मानसिक छळ’ अन् जबाबदारी झटकण्यासाठी नको नको ते आरोप !
Next articleBadlapur School Case : ‘लाडकी बहीण योजना’ बंद पाडण्यासाठी बदलापूर घटनेचे राजकारण – प्रवीण दरेकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.