Home ठाणे बदलापूर प्रकरणः शाळा, पोलिसांकडून पीडितेच्या पालकांचा ‘मानसिक छळ’ अन् जबाबदारी झटकण्यासाठी नको...

बदलापूर प्रकरणः शाळा, पोलिसांकडून पीडितेच्या पालकांचा ‘मानसिक छळ’ अन् जबाबदारी झटकण्यासाठी नको नको ते आरोप !

41
0

आशाताई बच्छाव

1000675504.jpg

बदलापूर प्रकरणः शाळा, पोलिसांकडून पीडितेच्या पालकांचा ‘मानसिक छळ’ अन् जबाबदारी झटकण्यासाठी नको नको ते आरोप !

शाळा व्यवस्थापन आणि स्थानिक पोलिसांच्या बेजबाबदारपणाबाबत चौकशी समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते.

युवा मराठा न्यूज ठाणे ब्यूरो चीफ :- फैय्याज मोमीन

शाळेत लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल करू नये, याकरिता शाळा प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी त्यांच्या कुटुंबाचा मानसिक छळ केल्याचा ठपका शासनाने या प्रकरणाच्या तपासासाठी नेमलेल्या दोन सदस्य समितीने ठेवला असल्याचे समजते.

पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी अत्याचाराची माहिती सर्वप्रथम शाळा प्रशासनाला दिली होती. मात्र शाळेच्या मुख्याध्यापिकेने हा प्रकार शाळेत घडलाच नाही, कुठेतरी बाहेर घडला आहे, असा दावा केला. मुलीच्या गुप्तांगाला झालेली जखम सायकल चालवल्यामुळेही होऊ शकते, असे म्हणत मुख्याध्यापिकेने ही घटना दडपली कशी जाईल हे पाहिले, या मागील कारणाचा शोध चौकशीअंती लागेल, असे सांगण्यात येते.

शाळा व्यवस्थापन दखल घेत नसल्याने अत्याचारग्सत मुलीच्या कुटुंबीयांनी बदलापूर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे यांची तातडीने भेट घेतली. शितोळे यांनीही मुख्याध्यापिकेचीच री ओढली आणि तीच थिएरी पालकांना ऐकवली. सायकल चालवल्यामुळे किंवा घरात, घराजवळही असा गैरप्रकार होऊ शकतो, असे म्हणत शितोळे यांनी शाळा व्यवस्थापनाचीच पाठराखण केली. शाळा व्यवस्थापन आणि स्थानिक पोलिसांच्या बेजबाबदारपणाबाबत चौकशी समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते.

प्रकरण दडपण्याचा शाळा, पोलिसांचा प्रयत्न
शाळेच्या मुख्याध्यापिकेने जबाबदारी झटकण्याकरिता पीडित मुलीच्या पालकांवरच नको नको ते आरोप केले.

शाळा व्यवस्थापनाने खासगी रुग्णालयाचा वैद्यकीय अहवाल अमान्य केला आणि सायकल चालवल्यामुळे जखम झाली असेल, असा दावा केला.

पोलिसांनीही सायकलमुळे जखम होऊ शकते, असे म्हणत दुर्लक्ष केले. मात्र, मनसे पदाधिकारी आणि सामाजिक संस्था पदाधिकाऱ्यांच्या आग्रही मागणीमुळे पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला, याकडे समितीने लक्ष वेधले आहे.

Previous articleतुमसर येथे महाविकास आघाडीचे काळ्या फिती लावून मूक आंदोलन
Next articleअलिबागमध्ये बेकायदा कॉल सेंटरचा पर्दाफाश, पोलिसांच्या कारवाईत ३५ जणांना अटक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here