Home गुन्हेगारी जायखेडा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी चोरीच्या ३५ मोटरसायकली केल्यात जप्त दोन चोरट्यांना अटक...

जायखेडा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी चोरीच्या ३५ मोटरसायकली केल्यात जप्त दोन चोरट्यांना अटक !

543
0

आशाताई बच्छाव

1000671150.jpg

जायखेडा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
चोरीच्या ३५ मोटरसायकली केल्यात जप्त दोन चोरट्यांना अटक !
(राजेंद्र पाटील राऊत)
जायखेडा दि.२३,:- जायखेडा पोलिस स्टेशन येथे दाखल असलेल्या मोटार सायकल चोरीचा गुन्हा रजिस्टर नंबर ३२३/२०२४ बिएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे १८ आँगस्ट २०२४ रोजी दाखल होताच जायखेडा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी विक्रम देशमाने पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, अनिकेत भारती अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव, नितीन गणापूरे उपविभागीय पोलिस अधिकारी मालेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कर्मचाऱ्यांसह व गुप्त माहितीच्या आधारावर तपासास सुरुवात केली असता,चोरीस गेलेली मोटरसायकल क्रमांक एम एच ४१ ए.व्ही. ५३४६ याबाबतीत माहिती काढून तपासादरम्यान आरोपी बादल भाऊदास पवार वय १९, शिवा छोटू पवार वय २६ दोन्ही रा. मुल्हेर ता.सटाणा जि.नाशिक,जयेश वाडीया माळवीस रा.झरी ता.बुशीर जि.डांग गुजरात यांना अटक केल्यानंतर पोलिस तपासात वरील आरोपींनी चोरीच्या एकूण ३५ मोटर सायकली काढून दिल्यात.या गुन्ह्यांच्या तपासाकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांना वरिष्ठांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तर पोलिस कर्मचारी व गुप्त माहितीच्या आधारावर या मोटर सायकल रँकेटचा छडा लावण्यात जायखेडा पोलिसांना यश आले आहे.
ज्या वाहनधारकांच्या मोटरसायकली चोरीस गेलेल्या आहेत व त्याची तक्रार जायखेडा पोलिसांत नोंद असेल अशा वाहनधारकांनी जायखेडा पोलिस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी केले आहे.

Previous articleसंपादकीय ….. पुरोगामी महाराष्ट्राला झाले तरी काय? तर “या” नराधमांचा चौरंगा करा!!
Next articleमुसळधार पावसामुळे म्हसदी ते काळगाव कायंकडा धरणाचे पाणी पुलावरून रस्ता बंद
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here