Home जळगाव प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय जळगाव उपकेंद्र यांच्या मार्फत राक्षबंधन कार्यक्रम संपन्न.

प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय जळगाव उपकेंद्र यांच्या मार्फत राक्षबंधन कार्यक्रम संपन्न.

138

आशाताई बच्छाव

1000668848.jpg

प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय जळगाव उपकेंद्र यांच्या मार्फत राक्षबंधन कार्यक्रम संपन्न.
जळगाव विभागीय संपादक नरेंद्र पाटील . युवा मराठा न्यूज
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा प्रख्यात उद्योजक समर्थ इंडस्ट्रीज चे मालक श्री सतिश पाटील सर, यांच्या कंपनी मध्ये दरवर्षी प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्व विद्यालय येथील दिदी तेजल बेहन आणि शीतल बेहन , स्नेहा ट्रेडिंग चे मालक श्री शरद अजनाड कर यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन चा कार्यक्रम पार पडला यामध्ये दिदीने सर्वना आजच्या काळात महिला ससक्ती करणाची गरज आहे . प्रत्येक स्त्री ला एकत्र येऊन स्वतः चे रक्षण कसे करावे या विषयी माहिती दिली .तसेच शासनाने महिला च्या रक्षण करण्यासाठी योग्य ती सुविधा उपलब्ध कराव्यात जेणे करून आमच्या माता बघिणी आमच्या मुली सुरक्षित राहतील . श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आमची माता बघिणी रात्री 12 ला घरा बाहेर पडले तरी ती सुरक्षित होती एवढा मान त्याना होता .मात्र आता चित्र वेगळे झाले आहे . म्हणून प्रत्येक स्त्री ने स्वतः चे रक्षण स्वतः करायची हिम्मत करायला हवी आणि प्रत्येक पुरूष शाने पर स्त्री ला आपली बहीण समजवून घ्या वे तसेच स्त्री ने सुद्धा आपल्या मर्यादा सोडू नये कारण दिदी म्हणाले की परप्रांतीय आपली संस्कृती स्वीकारत आहे आणि आपण मात्र त्याच्या संस्कृती आणत आहोत हे चुकीचे आहे म्हणून स्त्री ने आपली मर्यादा सोडू नये .असे मार्गदर्शन केले. सर्व उपस्थित मंडळी ला राखी बांधून आपल्या बहिणी प्रमाणे प्रत्येक पर स्त्री ला बहीण समजून तिचे रक्षण करावे .असा संकल्प केला. आणि रक्षाबंधन चा हा कार्यक्रम अगदी आनंदात पार पडला .

Previous articleनिवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत संवेदनशीलपणे उपाययोजना करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Next articleकाँगेस पदाधिकारी सय्यद जावेद अली यांचा टिळक भवन येथे सत्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.