Home छ. संभाजीनगर मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या अध्यक्षपदी आदेश पालसिंग छाबडा, तर महासचिवपदी...

मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या अध्यक्षपदी आदेश पालसिंग छाबडा, तर महासचिवपदी श्यामसुंदर लोया      

25
0

आशाताई बच्छाव

1000662844.jpg

मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या अध्यक्षपदी आदेश पालसिंग छाबडा, तर महासचिवपदी श्यामसुंदर लोया
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी: मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या अध््यक्षपदी आदेशपालसिंग छाबडा यांची फेरनिवड, तर महासचिवपदी शामसुंदर लोया यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली.
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांच्या व्यापारी संघटनाची शिर्ष संघटना मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या सर्वसाधारण सभेचे रविवारी दि. १८ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, ट्रेड अँड एग्रीकल्चरचे माजी अध्यक्ष मानसिंग पवार, सत्यनारायण लाहोटी, महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष प्रफुल मालाणी, महाराष्ट्र चेंबरचे माजी उपाध्यक्ष तनसुख झांबड यांच्या मार्गदर्शनाखाली हॉटेल द ओरेस येथे ही बैठक घेण्यात आली. या सर्वसाधारण सभेत मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या अध्यक्षपदासाठी आदेशपालसिंग छाबडा यांची फेरनिवड, तर महासचिव पदी जालना जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यकारी सचिव शामसुंदर लोया यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच कोषाध्यक्ष पदी विकास साहुजी, माजी अध्यक्ष प्रफुल मालाणी, सीनियर उपाध्यक्षपदी सुरेंद्र रेडासनी, उपाध्यक्ष पदी गजानन घुगे, सूर्यकांत हाके, लक्ष्मीकांत राठी, संजय मोदानी, सचिव पदासाठी संतोष कावळे पाटील, जफर मिर्झा, तर सहसचिव पदी संजय दाड व संदीप लाहोटी यांची  सर्वानुमते निवड करण्यात आली. नवीन संचालक मंडळाचे सर्व व्यापारी वर्गात अभिनंदन होत आहे.
यावेळी कार्यकारी मंडळ निवडण्यात आले. यात विनीत साहनी, सुभाष लदनीया, अनंत रुद्रवार, नितीन वट्टमवार, सुरेश तांबे, चंपालाल लोढा, भास्कर जाधव, धनंजय जेवलीकर, ज्ञानेश्वर उगले, पवन लोहिया, आदी जण बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous articleसकल मराठा समाजाला खोटे पाडून ‘मम्’च म्हणणार; यात आश्चर्य ते काय?
Next articleरायगडच्या धैर्यशील पाटील यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here