Home उतर महाराष्ट्र शनिशिंगणापुरात भाविकांची मांदियाळी

शनिशिंगणापुरात भाविकांची मांदियाळी

114

आशाताई बच्छाव

1000657827.jpg

शनिशिंगणापुरात भाविकांची मांदियाळी

सलग तीन दिवस सुट्यांमुळे गर्दी : जयघोषाने दुमदुमला परिसर
शनिशिंगणापूर,(कारभारी गव्हाणे प्रतिनिधी)-  आज दुसऱ्या श्रवणी शनिवारनिमित्त पहाटे पाच ते सात वाजता मूर्तीला जलाभिषेक घालण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी केली होती. ओल्या वस्वाने दर्शन करणाऱ्या युवकांनी सलग दोन तास शनिचौथरा गर्दनि फुलून गेला होता. ‘सूर्यपूत्र शनिदेव की जय, पवनपुत्र हनुमान की जय, नामाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. स्वातंत्र्य दिन, शुक्रवार व आज शनिवार, अशा तीन दिवसांत पाच लाखांहून अधिक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला.
आज पहाटे साडेचार वाजता मुख्य पुजारी अशोक कुलकर्णी यांच्या हस्ते पूजन व नंतर आरती झाल्यानंतर जलाभिषेक करता चौथरा खुला करण्यात आला. परिसरातील युवकांसह मुंबई, गुजरात, दिल्ली व इतर राज्यातील भाविक ओल्या वस्वाने
शनिशिंगणापूर दुसऱ्या श्रावणी शनिवारनिमित्त दुपारी चौथरा परिसरात दर्शनासाठी झालेली गर्दी.
दर्शन रगित उभे होते. पाच वाजता सुरू झालेला जलाभिषेक सात वाजेपर्यंत सुरू होता. सात हजारांहून अधिक भक्तांनी चौथरा दर्शन व मूर्तीला जलाभिषेक केला. पहाटे सोनई, घोडेगाव व कांगोणी रस्त्यावर पायी दर्शन करणाऱ्या भक्तांची विक्रमी गर्दी पाहण्यास मिळाली. अनेक सेवाभावी भक्तांनी
चहा, फळे व शाबुदाणा खिचडीचे वाटप केले. देवस्थानतर्फे भक्तांना मूलभूत सुविधा देण्यात आल्या.
जलाभिषेकच्या नावाखाली व्यावसायिक व खासगी लॉजमालकांनी भक्तांची अडवणूक केल्याच्या तक्रारी भाविकांतून पुढे आल्या. शनिशिंगणापूर पोलिसांनी मोहीम हाती घेऊनही गावात
वाहनचालकांची अरेरावी
व रस्त्यावर चोरून, लपून भक्तांना सक्ती करण्यात आली. काळ्या तीळाचे तेल म्हणून अनेकांनी अव्वाच्या सव्वा रक्कम घेऊन फसवणूक केल्याचे सांगितले. पहाटे माजी खासदार चंद्रकांत खैरे, दुपारी प्रदीप नार्वेकर व सायंकाळी छत्रपती संभाजीनगर येथील सचिन चोरडिया यांच्या हस्ते आरती सोहळा झाला,

Previous articleपरळीत २१ ऑगस्ट पासून ०५ दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव
Next articleआयुर्वेद महाविद्यालय रुग्णालय स्थापण करण्याण्यासाठी कटिबद्ध:आ. संजय कुटे; माहितीची विस्तारित कार्य करणी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.