Home गडचिरोली मुतनुर च्या पर्यटन विकासासाठी सातत्याने प्रयत्न आमदार डॉक्टर देवरावजी होळी

मुतनुर च्या पर्यटन विकासासाठी सातत्याने प्रयत्न आमदार डॉक्टर देवरावजी होळी

113

आशाताई बच्छाव

1000657693.jpg

मुतनुर च्या पर्यटन विकासासाठी सातत्याने प्रयत्न

आमदार डॉक्टर देवरावजी होळी

आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते पर्यटन स्थळ मुतनुर येथे पर्यटन विकास कामांचे भूमिपूजन

 गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)

मुतनूरच्या पर्यटन विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असून पर्यटन विकासासाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. आपण मुतनुरच्या पर्यटन विकासासाठी आणखी निधी मिळावा यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरूच ठेवू असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मुतनूर येथील पर्यटन विषयक विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी केले.

यावेळी भाजपा जिल्ह्याचे नेते प्रणयजी खुणे, जैराम चलाख, साईनाथ बुरांडे, सुरेश शहा सरपंच माधुरी आतला, बाबुराव झुरी, भाऊराव कुमरे, विनोद कोंदामी, डी. बी. नरोटे अनिल नरोटे, सीताराम पदा, श्रीरंग नरोटे, काजल नरोटे, पिंकी नरोटे, देवाजी पुडो, कालिदास पुडो, सीताराम पदा, कान्हूजी नरोटे, यांचे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.