Home जळगाव तडीपार केलेल्या आरोपीस चाळीसगाव पोलिसांनी केली अटक

तडीपार केलेल्या आरोपीस चाळीसगाव पोलिसांनी केली अटक

317
0

आशाताई बच्छाव

1000616266.jpg

तडीपार केलेल्या आरोपीस चाळीसगाव पोलिसांनी केली अटक

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या जगदीश जगन्नाथ महाजन रा. नेताजी चौक यास चाळीसगाव शहर पोलीसांनी अटक केली. महाजन याचे विरूद्ध शरीराविरूद्धचे व अंमली पदार्थ अवैध मार्गाने विक्री प्रकरणी गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, हद्पार व गुन्हेगारांची तपासणीचे आदेश पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिले होते. चाळीसगाव शहर तसेच जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या जगदीश जगन्नाथ महाजन हा विना परवाना चाळीसगाव शहरात फिरत असल्याची माहिती निरीक्षक पाटील यांना मिळाली असता उपनिरीक्षक योगेश माळी, पोकाँ. पवन पाटील, रविंद्र बच्छे,गोपाल पाटील यांनी वसंत डेअरी जवळून महाजन यास ताब्यात घेतले.
यावेळी महाजन याने विनाकारण आरडाओरड करून पोलीसांना अरेरावी करून पोलीस पथकाबरोबर धक्काबुक्की करून दमदाटी केली. याप्रकरणी महाजन याचे विरूद्ध भारतीय न्याय संहिता 2023चे कलम 132,121(1),351(3)352 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.तपास उपनिरीक्षक कैलास पाटील, हवालदार विनोद भेाई हे करीत आहेत.

Previous articleनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही
Next articleजिल्हा सामान्य रुग्णालयाची नेहमीचीच रडगाणी! – ओपिडीत चक्क शौचालयाचे घाण पाणी !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here