Home नाशिक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

212

आशाताई बच्छाव

1000602014.jpg

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
प्रतिनिधी l नाशिक मुकुंदा चित्ते
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने १०४ वी जयंती देवळाली कॅम्प जुन्या बस स्थानक परिसरात अभिवादन करत साजरी करण्यात आली.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तानाजी करंजकर, अरुण जाधव, निलेश बंगाली,जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लांडगे कार्याध्यक्ष मनीष ससाणे व कार्यकारिणीच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. मध्यरात्री वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. दुपारी गुरुद्वारा रोडवरील महालक्ष्मी मंदिर परिसरात समितीच्या वतीने भोजन वाटप करण्यात आले. सांयकाळी साठे नगर व सहा चाळ येथून मिरवणूक काढण्यात. या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लांडगे, कार्याध्यक्ष मनिष ससाणे, कैलास बकुरे,भरत वाघमारे, रवींद्र बोराडे उपाध्यक्ष रोहन गायकवाड, चिटणीस राहुल सकट, सरचिटणीस अक्षय भालेराव, खजिनदार शैलेश बोराडे, सहखजिनदार बापुसाहेब गावित,मिरवणूक अध्यक्ष विनोद भोसले,रोहीत भारस्कर, सुधीर शेलार आदींसह समाज बांधव प्रयत्नशील होते.

Previous articleमुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेतील युवकांमुळे प्रशासन आणखी गतीमान व्हावे : जिल्हाधिकारी
Next articleगरीब कुटुंबाला आर्थिक मदत. ईजी. विश्वंभर पवार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.