Home नांदेड डॉ.साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी...

डॉ.साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी.

210

आशाताई बच्छाव

1000600506.jpg

डॉ.साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

देगलूर -फुले शाहू आंबेडकर सेवाभावी संस्थाद्वारा संचलित आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल देगलूर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आज मोठ्या उत्साहात आज मोठ्या उत्साहात आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल येथे साजरी करण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. फुले शाहू आंबेडकर सेवाभावी संस्थेचे संचालक प्राध्यापक सोनकांबळे सर व संचालिका सुनंदा मॅडम ह्या उपस्थित होते. यावेळी शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेच्या पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून यादव माऊली कर साहेब उपस्थित होते. यावेळी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत असताना प्राध्यापक सोनकांबळे सर यांनी सविस्तर मांडणी केली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे खऱ्या अर्थाने वास्तविक साहित्यकार होते.

Previous articleकांस्य पदकाचा वेध घेणारा स्वप्नील महाराष्ट्राचा अभिमान!
Next articleभगुर नगरपालिकेचा भोंगळा कारभार महात्मा गांधी रोड, मारुती मंदिराजवळील संपूर्ण रस्ता फोडून काढत या रस्त्याची दुरवस्था करुन ठेवली
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.